ब्रिटिश राज

(ब्रिटिश भारत या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तानबांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे.

भारतीय साम्राज्य
Indian Empire
British Raj

१८५८१९४७  
 
ध्वज चिन्ह
चित्र:British Indian Empiare 1909 Imperial Gazetteer of India.jpg
ब्रिटिशांचे भारतातील साम्राज्य, १९०९
ब्रीदवाक्य: HEAVEN'S LIGHT OUR GUIDE
राजधानी कलकत्ता (१८५८ - १९१२)
नवी दिल्ली (१९१२ - १९४७)
सर्वात मोठे शहर कलकत्ता, दिल्ली
अधिकृत भाषा इंग्लिश, हिंदुस्तानी, अन्यa अनेक भाषा
राष्ट्रीय चलन भारतीय रुपये (Indian Rupay)
क्षेत्रफळ4,903,312 चौरस किमी

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारतपाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.

प्रांत संपादन

ब्रिटीश राजच्या अखत्यारीत खालील प्रांत होते.

मुख्य प्रांत संपादन

ब्रिटीश राजचे प्रांतक्षेत्रफळ (हजार वर्ग मैल)लोकसंख्या
बर्मा(सध्याचा म्यानमार)१७०९० लाख
बंगाल (सध्याचे बांगलादेश, पश्चिम बंगाल, बिहारओडिशा)१५१७.५ कोटी
मद्रास(सध्याचे कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,आंध्रप्रदेश,ओरिसा आणि लक्षद्वीप समूह)१४२३.८ कोटी
बॉम्बे(सध्याचे पाकिस्तानातील सिंध,गुजरात,महाराष्ट्र,कर्नाटक आणि आफ्रिकेतील एडन)१२३१.९ कोटी
संयुक्त प्रांत (सध्याचे उत्तर प्रदेशउत्तराखंड)१०७४.८ कोटी
मध्य प्रांत (सध्याचे मध्य प्रदेश, महाराष्ट्रछत्तीसगढ)१०४१.३ कोटी
पंजाब(सध्याचे पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांत)९७२ कोटी
आसाम(सध्याचे आसाम,मेघालय,नागालॅंड,मिझोरम,अरुणाचल प्रदेश)४९६० लाख

इतर प्रांत संपादन

प्रांतक्षेत्रफळ (हजार वर्ग मैल)लोकसंख्या
नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स (सध्याचा पाकिस्तान मधील प्रांत)१६२१.२५ लाख
बलुचिस्तान(सध्याचा पाकिस्तान मधील प्रांत)४६३.०८ लाख
कूर्ग(सध्याचा कर्नाटक राज्यातील जिल्हा)१.६१.८१ लाख
अजमेर (सध्याचा राजस्थान राज्यातील एक जिल्हा)२.७४.७७ लाख
अंदमान आणि निकोबार(भारतातील अंदमान आणि निकोबार बेटे)२५,०००

ब्रिटीश भारतातील संस्थानांच्या एजन्सीज्:-

१. राजपुताना स्टेट एजन्सी

२. डेक्कन स्टेट एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सी

३. पटियाला आणि पूर्व पंजाब स्टेट एजन्सी

४. बलुचिस्तान एजन्सी

५. ग्वाल्हेर रेसिडेन्सी

६. वायव्य सीमांत स्टेट एजन्सी

७. गिलगीत एजन्सी

८. गुजरात स्टेट एजन्सी आणि वडोदरा रेसिडेन्सी

९. मध्य भारत एजन्सी

१०. पूर्वीय स्टेट एजन्सी

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमहाराष्ट्र दिनकुतुब मिनारमुखपृष्ठअलिप्ततावादी चळवळमुहम्मद बिन तुघलकविशेष:शोधाभारत सरकार कायदा १९३५भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्राचा इतिहासदिशाबाबासाहेब आंबेडकरमराठी भाषानवग्रह स्तोत्रभारतीय स्थापत्यकलागणपती स्तोत्रेदुसरे महायुद्धलोकमान्य टिळकसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्रभारताचे संविधानकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनाटोमनसबदारस्वदेशी चळवळभारतीय रिझर्व बँकसंभाजी भोसलेखासदारशाह जहानभाषावार प्रांतरचनाज्ञानेश्वरसोव्हिएत संघपुणे लोकसभा मतदारसंघसंत तुकारामब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबारामती लोकसभा मतदारसंघशाहू महाराज