बांगलादेश

आशिया खंडातील देश


बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीमध्ये पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.

बांगलादेश
গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
बांगलादेश प्रजासत्ताक
बांगलादेशचा ध्वजबांगलादेशचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: जॉय बांगला
राष्ट्रगीत: Amar Sonar Bangla - official vocal music of the National anthem of Bangladesh.ogg अमार सोनार बांगला
आमार सोनार बांग्ला
बांगलादेशचे स्थान
बांगलादेशचे स्थान
बांगलादेशचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ढाका
अधिकृत भाषाबंगाली (बांगला)
 - राष्ट्रप्रमुखझिल्ल-उर-रेहमान
 - पंतप्रधानशेख हसीना
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशमुझ्झमल होसेन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(पाकिस्तानपासून)
मार्च २६, १९७१ 
 - प्रजासत्ताक दिन४ नोव्हेंबर १९७२ 
क्षेत्रफळ
 - एकूण१,४३,९९८ किमी (९४वा क्रमांक)
 - पाणी (%)७.०
लोकसंख्या
 -एकूण१४,७३,६५,००० (७वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता९८५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण३०५.६ अब्ज अमेरिकन डॉलर (३१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२,०११ अमेरिकन डॉलर (१४३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनबांगलादेशी टका (BDT)
आंतरराष्ट्रीय कालविभागबांगलादेशी प्रमाणवेळ (BDT) (यूटीसी+६)
आय.एस.ओ. ३१६६-१BD
आंतरजाल प्रत्यय.bd
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+८८०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा
बांगलादेशातील राष्ट्रीय संसद भवनचे समोरचे दृश्य

ढाका ही बांगलादेशची राजधानी व सर्वात मोठे शहर असून चट्टग्राम, सिलहट, राजशाही इत्यादी इतर मोठी शहरे आहेत. ब्रम्हपुत्रा, पद्मामेघना ह्या येथील प्रमुख नद्या आहेत. २०११ साली बांगलादेशची लोकसंख्या सुमारे १४.९७ कोटी होती. बांगलादेश हा जगातील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे.

प्रशासकीय विभाग संपादन

बांगलादेश एकूण ८ प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला आहे.

विभागमुख्यालयस्थापनाउपविभागक्षेत्रफळ (km2)[१]लोकसंख्या (2011)[१]घनता (/
km2) (2011)[१]
जिल्हेउपजिल्हेग्रामीण परिषदा
खुलना विभागखुलनाइ.स. 1960105927022,284.221,56,87,759699
चट्टग्राम विभागचट्टग्रामइ.स. 18291110194933,908.552,91,45,000831
ढाका विभागढाकाइ.स. 1829131231,24820,593.743,64,33,5051,751
बारिसाल विभागबारिसालइ.स. 199363933313,225.2083,25,666613
मयमनसिंह विभागमयमनसिंहइ.स. 201543435010,584.061,13,70,0001,074
रंगपूर विभागरंगपूरइ.स. 201085853616,184.991,57,87,758960
राजशाही विभागराजशाहीइ.स. 182987055818,153.081,84,85,8581,007
सिलहट विभागसिलहटइ.स. 199543833412,635.2298,07,000779
एकूण ८ढाका645224,5761,47,610.0014,69,68,0411,106

वाहतूक संपादन

बांगलादेशात अनेक महामार्ग अस्तित्वात असून सर्व प्रमुख शहरे महामार्गांद्वारे जोडली गेली आहेत. बांगलादेश रेल्वे ही देशामधील एकमेव रेल्वे वाहतूक कंपनी असून देशात आजच्या घडीला २,७०६ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे आहे. बांगलादेशामधील अनेक नद्यांमुळे जलवाहतूक हा येथील वाहतूकीचा एक प्रमुख मार्ग आहे. बांगलादेशात ८,०४६ किमी लांबीचे जलमार्ग अस्तित्वात आहेत. बिमान बांगलादेश एरलाइन्स ही येथील सरकारी विमानवाहतूक कंपनी असून ढाक्याचा शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ बांगलादेशातील प्रमुख विमानतळ आहे.

खेळ संपादन

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ a b c "2011 Population & Housing Census: Preliminary Results" (PDF). Bangladesh Bureau of Statistics. Archived from the original (PDF) on 15 January 2013. 12 January 2012 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजपंकजा मुंडेबाबासाहेब आंबेडकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविशेष:शोधामुखपृष्ठबच्चू कडूगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रसोनेभारताचे संविधानपरभणी लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेसंभाजी भोसलेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभावर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षखासदारपुणे लोकसभा मतदारसंघशरद पवारस्वामी समर्थमहाराष्ट्र दिनमटकामहाराष्ट्रामधील जिल्हेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंत तुकाराममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजागतिक दिवसरक्षा खडसेनितीन गडकरी