ग्रह

खगोलशास्त्रीय वस्तू

अवकाशात सूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होय. सध्या असे आठ ग्रह आपल्या सुर्यामालेभोवती आहेत पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा आकार गोल असतो.

काही ग्रह खडकाळ (पृथ्वी, मंगळ इ.) तर काही वायुमय (गुरू, शनी इ.) असतात. सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरू ग्रह ओळखला जातो. त्याचा आकार इतर ग्रहापेक्ष्या मोठा आहे.सूर्य हा एक तारा आहे.चंद्र स्वतः भोवती फिरत फिरत पृथ्वी भोवतीही प्रदक्षिणा करतो, यालाच "परिभ्रम्हण" म्हणतात.स्वतः भोवती फिरणे म्हणजे परिवलन होय.पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्या भोवतीही प्रदक्षिणा करते.म्हणून तर पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू येतात.पृथ्वीचा परिवलन काळ 24 तासाचा असतो व परिभ्रमन काळ 365 दिवसाचा असतो.दर चार वर्षांनी लीप वर्ष येते.लीप वर्षातील फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो.सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वी वर येण्यास 8 मिनिटे व 20 सेकंद लागतात.सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहाला अंतर्ग्रह आणि पृथ्वीपलीकडे असणाऱ्या ग्रहाला बाह्यग्रह म्हणतात. बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत आणि बाकीचे (गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे) बाह्यग्रह आहेत.

सूर्याशिवाय अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहसदृश वस्तूला परग्रह म्हणतात.

हिंदू धर्मातील ग्रहांचे स्थान संपादन

हिंदू धर्मामध्ये ग्रहांना विशेष स्थान आहे. व्यास ऋषींनी लिहिलेल्या 'नवग्रह स्तोत्रात' ग्रहांचा अचूक उल्लेख आहे.

मुख्य लेख: नवग्रह स्तोत्र

परंपरागत हिंदू ज्योति़षशास्त्राने जन्मकुंडली निर्मितीसाठी रवी (सूर्य), सोम (चंद्र), मंगळ, बुध, बृहस्पती (गुरू), शुक्र, शनी, राहू आणि केतू असे नऊ ग्रह मानले आहेत. आधुनिक ज्योतिषी युरेनस आणि नेपच्यूनलाही ग्रह मानतात आणि ते जन्मकुंडलीत किंवा लग्न कुंडलीत दाखवतात.

वक्री ग्रह
ज्योतिष शास्त्रानुसार चंध्र आणि सूर्य सोडले तर उरलेले सर्व ग्रह कधीनाकधी वक्री होतात. म्हणजे आकाशातून प्रवास करताना पुढे जाण्याऐवजी मागे जात आहेत असे दिसते. क्वचित एखादा ग्रह त्याच्या चालू राशीमधून मागच्या राशीत जातो. २०२० सालच्या मे महिन्यामध्ये अनेक ग्रह वक्री होत/झाले आहेत.

संदर्भ संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजपंकजा मुंडेबाबासाहेब आंबेडकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविशेष:शोधामुखपृष्ठबच्चू कडूगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रसोनेभारताचे संविधानपरभणी लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेसंभाजी भोसलेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभावर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षखासदारपुणे लोकसभा मतदारसंघशरद पवारस्वामी समर्थमहाराष्ट्र दिनमटकामहाराष्ट्रामधील जिल्हेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंत तुकाराममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजागतिक दिवसरक्षा खडसेनितीन गडकरी