कॅलिगुला

तिसरा रोमन सम्राट

गैयस ज्युलिअस सीझर जर्मेनिकस' तथा कॅलिगुला (३१ ऑगस्ट, १२ - २४ जानेवारी, ४१) हा ज्युलिओ-क्लॉडिअन वंशाचा तिसरा रोमन सम्राट होता. याच्या आधीचा सम्राट टायबीअरिअस याचा हा नातू होता. टायबीअरिअस सिरीयात मरण पावल्यानंतर इ.स. ३७ ते इ.स. ४१ असे सुमारे पाच वर्षे हा रोमच्या सम्राटपदी होता.

कॅलिगुला
रोमन साम्राज्याचा ३ रा सम्राट
अधिकारकाळ१६ मार्च, ३७ ते २४ जानेवारी, ४१
पूर्ण नावगैयस ज्युलिअस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस
जन्म३१ ऑगस्ट, १२
ॲंटिअम, इटली
मृत्यू२४ जानेवारी, ४१
पॅलेटाईन हील, रोम
पूर्वाधिकारीटायबीअरिअस
उत्तराधिकारीक्लॉडिअस
वडीलजर्मेनिकस
आईॲग्रिपिना द एल्डर

वैयक्तिक माहिती संपादन

त्याचा जन्म इटलीतील ॲंटियम (सध्याचे ॲंझियो गाव) येथे झाला. तो जर्मेनिकसअग्रिपिनाचा सहावा मुलगा होय.[१] लहानपणापासून त्याला सम्राटपदाचे शिक्षण दिले गेले होते. मार्च १६, इ.स. ३७रोजी प्रेटोरियन रक्षकांच्या मदतीने राज्यपदी आल्यापासून त्याला मारण्याचे कट रोमन सरदारांमध्ये सुरू झाले.
त्याच्या राज्यकालात कालिगुला अत्यंत क्रुर, निष्ठुर, उधळ्या आणि माथेफिरू असल्याची नोंद आहे. एका वदंतेनुसार त्याने आपल्या घोड्याला रोमन सेनेटचा अधिकारी म्हणून नेमले.
जानेवारी २४, इ.स. ४१ रोजी ज्या प्रेटोरियन रक्षकांच्या साहाय्याने तो सम्राट झाला, त्यांनीच कालिगुलाला ठार केले.

कारकीर्द संपादन

कॅलिगुलाने आपल्या प्रजासत्ताकातील लोकांना लेखन-भाषण स्वातंत्र्य जाहीर केले. काही कर कमी करून करात सूटही दिली. पण त्याच्या उधळपट्टी धोरणामुळे लवकरच राज्याची तिजोरी मोकळी झाल्याने रद्द केलेले कर त्याने पुन्हा बसविले आणि सीनेटसभेवर जरबही बसविली. कॅलिगुला स्वतःला देव मानीत असे. सर्वांनी आपली पूजा करावी तसेच ज्यूंनी आपल्या पुतळ्याची सिनेगॉगमधून प्रतिष्ठापना करावी असा त्याने हुकूम काढला होता. त्याच्या या कृत्यास ज्यूंनी विरोध केल्यामुळे कॅलिगुलाने ज्यूंचा अतोनात छळ केला. कॅलिगुलाच्या या उद्दाम वर्तनास कंटाळून सुरक्षा दलातील काही अधिकाऱ्यांनी त्याचा खून करून क्लॉडिअस या वृद्ध अधिकाऱ्यास सम्राटपदी बसविले.

वंशावळ संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ स्युटोनिअस. "द लाईव्ज ऑफ ट्वेल्व सीझर्स, लाईफ ऑफ कॅलिगुला" (इंग्रजी भाषेत). २० मे, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

बाह्य दुवे संपादन

मागील:
टायबीअरिअस
रोमन सम्राट
मार्च १६, इ.स. ३७जानेवारी २४, इ.स. ४१
पुढील:
क्लॉडिअस
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेमुखपृष्ठमराठी भाषाविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरगंगाधर गाडेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानखासदारपुणे लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमटकामहाराष्ट्रसंभाजी भोसलेशरद पवारमाधवराव पेशवेकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाढा लोकसभा मतदारसंघलोकसभापेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरसांगली लोकसभा मतदारसंघशाहू महाराजभारताच्या पंतप्रधानांची यादीओमराजे निंबाळकररत्‍नाप्पा कुंभारअहमदनगर लोकसभा मतदारसंघहवामानसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेअक्षय्य तृतीया