जातिव्यवस्थेचे निर्मूलन

(अनाइअलेइशन् ऑफ कास्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste/ ॲन्हिलेशन ऑफ कास्ट) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे बहुचर्चित पुस्तक आहे, याचे प्रकाशन इ.स. १९३६ मध्ये झाले. जात-पात तोडक मंडळाद्वारे आयोजित त्याच्या वार्षिक अधिवेशनासाठी लाहोर येथे मार्च १९३६मध्ये डॉ. आंबेडकरांना अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते, परंतु मंडळाच्या सदस्यांनी जेव्हा कार्यक्रमाच्या आधी बाबासाहेबांचे भाषण पाहिले तेव्हा त्यांना ते आपत्तिजनक वाटते. मंडळाच्या सदस्यांनी या भाषणात बदल करण्यासाठी डॉ. आंबेडकरांना विनंती केली, मात्र डॉ. बाबासाहेबांनी भाषणात कोणतेही परिवर्तन करण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी या मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचा कार्यक्रम रद्द केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच भाषण जसेच्या तसे इ.स. १९३६ मध्ये ‘एनाहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने पुस्तक रूपात प्रकाशित करून टाकले जेणेकरून जास्तीत जास्त लोक याविषयी जाणू शकतील. हा ग्रंथ खूपच गंभीर ग्रंथ आहे. यात डॉ. आंबेडकरांनी जाती-व्यवस्थेच्या आधारावर त्याच्या उन्मूलना संबंधात गंभीर चर्चा केली आहे. जाती व्यवस्थेच्या उन्मूलना संबंधात त्यांनी लिहिले की, ‘‘जर तुम्ही जाती व्यवस्थेत छेद करू पाहत असाल तर तर यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेदांना आणि शास्त्रांना डायनामाईट लावावे लागेल, कारण वेद आणि शास्त्र कोणत्याही तर्काने वेगळे करतात आणि वेद व शास्त्र कोणत्याही नैतिकतेपासून वंचित करतात. तुम्ही ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’च्या धर्माला नष्ट करायलाच पाहिजे. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही.’’[१]

जातिव्यवस्थेचे निर्मूलन

जातिव्यवस्थेचे निर्मूलन
लेखकडॉ. बाबासाहेब आंबेडकर
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)ॲन्हिलेशन ऑफ कास्ट
भाषाइंग्रजी
देशभारत
साहित्य प्रकारजातिव्यवस्था
प्रथमावृत्तीइ.स. १९३६
माध्यम[१]
पृष्ठसंख्या९०
आकारमान व वजन२८७ ग्रॅंम

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Ambedkar, Dr B. R. (2014-11-03). Annihilation of Caste (इंग्रजी भाषेत). Ssoft Group, INDIA.
🔥 Top keywords: क्लिओपात्रास्वराज्यअसहकार आंदोलनभारतातील जातिव्यवस्थागणपती स्तोत्रेसायमन कमिशनग्रंथालयबंगालची फाळणी (१९०५)मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९हैदराबाद मुक्तिसंग्रामवाचनसर्वनामभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७भारत सरकार कायदा १९३५महात्मा फुलेमुखपृष्ठलेखन पद्धतीराष्ट्रीय सभेची स्थापनाविशेष:शोधाशिवाजी महाराजक्रिप्स मिशनबंगालची कायमधारा पद्धतीबक्सरचे युद्धसंकष्ट चतुर्थीरस (सौंदर्यशास्त्र)मानसशास्त्रबाबासाहेब आंबेडकरनवग्रह स्तोत्रभारताचे संविधानसाहित्याची निर्मितिप्रक्रियादिशारमाबाई आंबेडकर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्रामधील जिल्हेविनायक दामोदर सावरकरसंत तुकारामगौतम बुद्धज्ञानेश्वरविलासराव देशमुख