बंगालची फाळणी (१९०५)

बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा १९ जुलै १९०५ रोजी भारताने तत्कालीन वाइसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती. फाळणीला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग पुन्हा एक झाले.

पूर्व बंगाल व आसामचा एकत्रित नकाशा

उत्पत्ति

संपादन

बंगाल प्रांताचे क्षेत्रफळ ४८९५०० वर्ग किलोमीटर आणि लोकसंख्या ८ कोटी अधिक होती. पूर्व बंगाल भौगोलिक रूपाने आणि कमी संप्रेषण साधने असल्यामुळे तो पश्चिम बंगाल पासून वेगळा होता. १८३६ मध्ये,अप्पर प्रांतांमध्ये एका लेफ्टनंट गव्हर्नरचे शासन स्थापित केले होते ते १८५४ मध्ये गव्हर्नर जनरल-इन-कौन्सिलने रद्द केले. या फाळणीमागे इंग्रजांची "फोडा आणि राज्य करा" ही दुष्ट निती होती.

बंगालची फाळणी (१९०५) बद्दल महत्त्वाचे मुद्धे

संपादन
  1. लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या हेतूने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
  2. बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
  3. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.
  4. आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली. टिळकांनी यालाच चतुःसूत्री असे नाव दिले.
  5. सन १९०५ ते १९२० नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.
  6. बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंग-भंग आंदोलन असे म्हणतात.
  • 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरविलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली.

संदर्भ

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशाहू महाराजविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीअंगारकी चतुर्थीसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेनवग्रह स्तोत्रदिशाज्ञानेश्वरमहाराष्ट्रबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताचे संविधानपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीइतर मागास वर्गॐ नमः शिवायसंत जनाबाईनामदेववर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्रीमहाराष्ट्रातील आरक्षणपसायदानपांडुरंग सदाशिव सानेवटपौर्णिमावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेवर्ग:खेड तालुक्यातील गावेमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी संतमराठी भाषावर्ग:राजापूर तालुक्यातील गावेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने