शिव स्मारक

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मुंबई

शिव स्मारक किंवा छ. शिवाजी महाराज स्मारक हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुंबईत बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगांव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आधारासह एकूण उंची २१२ मीटर असणार आहे. चीनमधील २०८ मीटर उंचीच्या स्प्रिंग टेंपल बुद्धापेक्षा याची उंची वाढवण्यात आली आहे.[१] या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.

छत्रपती शिवाजी महाराज

इतिहास

संपादन

२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिव स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता.[२] २०२१ पर्यंत याचे काम पूर्ण होईल, हा महाराष्ट्र सरकारचा दावा आहे.

वैशिष्ट्ये

संपादन

स्मारकाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.[३]

  • १६.८६ हेक्टर क्षेत्रफाच्या खडकावर स्मारक निर्माण केले जाईल. हे स्थळ गिरगांव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर, नरिमन पॉईंटपासून २.६ किलोमीटर, तर राजभवनपासून १.२ किलोमीटर अंतरावर असेल.
  • स्मारकाची तटबंदीला भिंत असेल, आत प्रवेश केल्यावर तुळजा भवानीचे एक मंदिर राहील.
  • शिवाजी महाराज यांच्या जीवनातील दृश्ये दाखवणारे देखावे असतील. कलासंग्रहालय आणि ग्रंथालयसुद्धा असेल.
  • याला एकूण ३,६०० कोटी रुपये खर्च लागणार आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "शिवपुतळ्याची उंची होणार २१० मीटर -Maharashtra Times". Maharashtra Times. 2017-03-26. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "'अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवा'". Loksatta. 2017-03-25. 2018-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ "असे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक-Maharashtra Times". https://maharashtratimes.indiatimes.com (मार्शलीज भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)[permanent dead link]
🔥 Top keywords: क्लिओपात्रावटपौर्णिमाशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील आरक्षणदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरइतर मागास वर्गज्ञानेश्वरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकाळाराम मंदिर सत्याग्रहभारताचे संविधानरायगड (किल्ला)ऋषीमुंजा (भूत)नालंदा विद्यापीठकबीरपसायदानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमुरलीकांत पेटकरमटकापदवीधर मतदारसंघ