ताकिन
ताकिन हा एक सस्तन चतुष्पाद प्राणी आहे. हा भारतातील अरुणाचल प्रदेश, तसेच भूतान आणि तिबेट मध्ये आढळतो.
ताकिन Takin | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
जाति (जीवविज्ञान) | ||||||||||||
|
त्याचे डोके मोठे असते. त्याला लांब, कमानीयुक्त शिंगे असतात. शिंगे नर व मादी दोन्ही लिंगांमध्ये असतात. शिंगाची लांबी सुमारे ३० सेमी (१२ इंच) असते. परंतु ते ६४ सेमी (२५ इंच) पर्यंत वाढू शकतात. नर व मादीचे चेहरे रंगाने काळे असतात.ताकिनच्या अंगावर काळसर जाड लोकर असते. ताकिन हे तपकिरी-लालसर, तपकिरी -पिवळ्या, पिवळसर-तपकिरी रंगाचे आढळतात. त्यांना कमी जास्त केस असतात. केसांची लांबी ३ सेमी (१.२ इंच) पर्यंत असू शकते. हिवाळ्यात डोक्याच्या खाली २४ सेमी (९.४ इंच) पर्यंत वाढू शकते. मादी ताकिनचे वजन २५०-३०० किलो तर नर ताकिनचे वजन ३००-३५० किलो असते. ताकिन आपल्या संपूर्ण शरीरावर एक तेलकट आणि उग्र गंधयुक्त पदार्थ ठेवतो.
प्रजाती
संपादनताकिनच्या चार प्रजाती ज्ञात आहेत:
- मिश्मी ताकिन (Mishmi takin) - ही प्रजाती भारतात अरुणाचल प्रदेश तसेच तिबेट आणि भूतान मध्ये आढळते.
- सोनेरी ताकिन (Golden takin)
- तिबेटी ताकिन (Tibetan takin)
- भूतान ताकिन (Bhutan takin) - हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. [१]
चित्रदालन
संपादन![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ee/Takin_Bhutan_1.jpg/220px-Takin_Bhutan_1.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/3a/Takin_at_National_Kandawgyi_Gardens_%40_Pyin_Oo_Lwin%2C_Myanmar.jpg/220px-Takin_at_National_Kandawgyi_Gardens_%40_Pyin_Oo_Lwin%2C_Myanmar.jpg)
संदर्भ
संपादन- ^ Tashi Wangchuk (2007). "The Takin - Bhutan's National Animal". In Lindsay Brown; Stan Armington (eds.). Bhutan. Lonely Planet. p. 87. ISBN 978-1-74059-529-2. 15 September 2011 रोजी पाहिले.
संदर्भ
संपादन🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठगणपती स्तोत्रेज्ञानेश्वरनवग्रह स्तोत्रराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्रामधील जिल्हेरत्नागिरी जिल्हासंत तुकारामदिशाअप्सरामहाराष्ट्रसुवर्णदुर्गवटपौर्णिमाइ.स. १९६५भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरायगड (किल्ला)पांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरमुरलीकांत पेटकरमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपसायदानसंभाजी भोसलेइ.स. ११००महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीमराठी भाषासातारा जिल्हारत्नागिरीतुकाराम मुंढेमहाराष्ट्र शासननामदेव