आमदार

राज्य विधानसभेचा सदस्य

आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे.हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.

आमदाराचा कालावधी

संपादन

विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.विधानसभेची मुदत संपल्याने आमदारकीचा कार्यकाल संपतो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते, परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात. आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेची ही मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते, परंतु एका वेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाढविता येत नाही.आमदार होण्यासाठी किमान वयोमर्यादा ही २५ वर्ष असणे आवश्यक असते.

आमदारांची आकडेवारी

संपादन

सध्या उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक ४०३ आमदार आहेत.तसेच सिक्कीम राज्यातील विधानसभेत सर्वात कमी ३२ आमदार आहेत.संपूर्ण भारत देशात सध्या ४१२३ आमदार आहेत.

भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आमदारांची संख्या

संपादन
राज्यविधानसभा आमदारांची संख्याविधानपरिषद आमदारांची संख्या
अंदमान आणि निकोबारलागू नाहीलागू नाही
आंध्र प्रदेश१७५५८
अरुणाचल प्रदेश६०लागू नाही
आसाम१२६लागू नाही
छत्तीसगड९०लागू नाही
बिहार२४३७५
चंदिगढलागू नाहीलागू नाही
दादरा आणि नगर-हवेलीलागू नाहीलागू नाही
दमण आणि दीवलागू नाहीलागू नाही
गोवा४०लागू नाही
गुजरात१८२लागू नाही
हरियाणा९०लागू नाही
हिमाचल प्रदेश६८लागू नाही
जम्मू काश्मीर९०लागू नाही
झारखंड८१लागू नाही
कर्नाटक२२४७५
केरळ१४०लागू नाही
लक्षद्वीपलागू नाही
मध्यप्रदेश२३०लागू नाही
महाराष्ट्र२८८७८
मणिपूर६०लागू नाही
मेघालय६०लागू नाही
मिझोराम४०लागू नाही
नागालॅंड६०लागू नाही
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली७०लागू नाही
ओरिसा१४७लागू नाही
पुदुच्चेरी३३लागू नाही
पंजाब११७लागू नाही
राजस्थान२००लागू नाही
सिक्कीम३२लागू नाही
तमिळनाडू२३४लागू नाही
तेलंगणा११९४०
त्रिपुरा६०लागू नाही
उत्तरप्रदेश४०३१००
उत्तराखंड७०लागू नाही
पश्चिम बंगाल२९४लागू नाही


संदर्भयादी

संपादन

१.https://en.m.wikipedia.org/wiki/Uttar_Pradesh_Legislative_Assembly२.https://en.m.wikipedia.org/wiki/State_legislative_assemblies_of_India

🔥 Top keywords: