चमार

बारा बलुतेदारांपैकी एक
चांभार
सूत कातनारी चांभार व्यक्ती, साभार- द ट्राइब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिनंस ऑफ इंडिया (१९१६)
एकूण लोकसंख्या

५ कोटी
प्रमाण
भारतातील लोकसंख्येत ५ ते ५.१ %

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख
उत्तर प्रदेश

इतर लक्षणीय लोकसंख्या
मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाणा[१]
इतरः-
पाकिस्तानबांगलादेश

भाषा
मुख्यः- हिंदी व स्थानिक भाषा
धर्म
हिंदू
संबंधित वांशिक लोकसमूह
जाटव • चांबर • धुसिया • भांबळी • जुलाहा चामर • कबीरपंथी जुलाहा • अहिरवार

सामाजिक स्थिती संपादन

चांभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. हाही चौथ्या क्रमांकाचा बलुतेदार. हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रामुख्याने उत्तर प्रदेशात राहतो. महाराष्ट्रात या वर्गाला चांभार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील चर्मकार मुलतः हिंदू धर्माचे पालन करतात. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यांत हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि पंजाबच्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.

चांभार हा बारा बलुतेदारांपैकी एक, चौथ्या क्रमांकाचा समाज आहे. बूट निर्मिती हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामड्याच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.

२००१ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील चमार जातीची लोकसंख्या २ कोटी ९८ लाख इतकी होती.[२] तर महाराष्ट्रात १२ लाख इतकी होती.[३]

उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व संपादन

संत रोहिदास:- महान हिन्दू संत.

जगजीवन राम :- भारताचे उप:प्रधानमंत्री.

सुशीलकुमार शिंदे :- महाराष्ट्र मुख्यमंत्री (माजी)

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ https://joshuaproject.net/maps/india/17405
  2. ^ "A-10 Individual Scheduled Caste Primary Census Abstract Data and its Appendix - Uttar Pradesh". Registrar General & Census Commissioner, India. 2017-02-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-07. Archived from the original on 2013-02-07. 2018-04-04 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरनवग्रह स्तोत्रगौतम बुद्धनृसिंहदिशाराजीव गांधीबुद्ध पौर्णिमाभारताचे संविधानज्ञानेश्वरसंत तुकाराम२०२४ लोकसभा निवडणुकामुंजा (भूत)महाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रमराठी भाषामहाराष्ट्रामधील जिल्हेखासदारमटकालोकसभादिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघनातीसुषमा अंधारेविकिपीडिया:चावडी/सर्व चावड्यामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळरायगड (किल्ला)संगीतातील रागजागतिक दिवससंभाजी भोसलेनामदेवभारतीय पंचवार्षिक योजनाशिवाजी महाराजांची राजमुद्राग्रामपंचायतभारताच्या पंतप्रधानांची यादी