मेनाकेम बेगिन

मेनाकेम बेगिन (हिब्रू: יִצְחָק רַבִּין; १६ ऑगस्ट १९१३ - ९ मार्च १९९२) हा १९७७ ते १९८३ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इ.स. १९७९ मध्ये बेगिनला इजिप्तच्या अन्वर अल सादात ह्याच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता.

मेनाकेम बेगिन

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
२१ जून १९७७ – १० ऑक्टोबर १९८३
मागीलयित्झाक राबिन
पुढीलयित्झाक शामिर

जन्म१६ ऑगस्ट १९१३ (1913-08-16)
ब्रेस्त, रशियन साम्राज्य (आजचा बेलारूस)
मृत्यू९ मार्च, १९९२ (वय ७८)
तेल अवीव, इस्रायल
राजकीय पक्षलिकुड
धर्मज्यू
सहीमेनाकेम बेगिनयांची सही

बेगिनचे शिक्षण पोलंडच्या वर्झावा येथे झाले. त्याचे वडील कट्टर ज्यू धर्मीय होते. तरुण वयात बेगिन स्वतः अनेक ज्यू संस्थांमध्ये कार्यरत होता. वर्झावामध्ये बेगिनला वाढता ज्यूविरोध जाणवू लागला व त्याने अनेक ज्यूंना बाहेर पडण्यात मदत केली. नाझी जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर त्याने वर्झावामधून पळ काढला व तो व्हिल्नियस शहरात पोचला. त्याच्या ज्यू धर्मप्रसारवादी कामांमुळे त्याला सोव्हिएत संघाने इ.स. १९४० मध्ये त्याला अटक केली व तुरुंगात डांबले. १९४२ मध्ये सुटकेनंतर पोलिश सैन्यातर्फे लढताना तो पॅलेस्टाईनमध्ये पोचला. त्याचे वडील, आई व भाऊ होलोकॉस्टमध्ये मारले गेले. पॅलेस्टाइनमध्ये त्याने स्वतंत्र इस्रायल देशासाठी लढा दिला.


बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमहाराष्ट्र दिनकुतुब मिनारमुखपृष्ठअलिप्ततावादी चळवळमुहम्मद बिन तुघलकविशेष:शोधाभारत सरकार कायदा १९३५भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्राचा इतिहासदिशाबाबासाहेब आंबेडकरमराठी भाषानवग्रह स्तोत्रभारतीय स्थापत्यकलागणपती स्तोत्रेदुसरे महायुद्धलोकमान्य टिळकसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्रभारताचे संविधानकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनाटोमनसबदारस्वदेशी चळवळभारतीय रिझर्व बँकसंभाजी भोसलेखासदारशाह जहानभाषावार प्रांतरचनाज्ञानेश्वरसोव्हिएत संघपुणे लोकसभा मतदारसंघसंत तुकारामब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबारामती लोकसभा मतदारसंघशाहू महाराज