मुंबई मेट्रो

मुंबई मेट्रो ही भारताच्या मुंबई शहरामधील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे. मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सद्य मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचे मुंबई मेट्रोचे ध्येय आहे. जून २००६ मध्ये भारताचे पंतप्रधान, श्री. मनमोहन सिंह, यांनी या प्रणालीच्या पहिल्या भागाचे भूमिपूजन केले. मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले.

मुंबई मेट्रो
स्थानमुंबई, महाराष्ट्र, भारत
वाहतूक प्रकारजलद परिवहन
मार्ग१ चालू
३ निर्धारित
मार्ग लांबी११.४ किमी (७.१ मैल) कार्यरत
१६०.९ किमी (१०० मैल) निर्धारित कि.मी.
एकुण स्थानके१२ चालू
९३ निर्धारित
दैनंदिन प्रवासी संख्या५,१३,३३८
सेवेस आरंभ८ जून २०१४
संकेतस्थळअधिकृत व्हेबसाईट
मार्ग नकाशा
मार्ग १ व २ चा नकाशा

इतिहास संपादन

मुंबई भारतची वित्तीय राजधानी असून हे भारताच्या आर्थिक व व्यापारिक केंद्रस्थान समजले जाते. मुंबईतील अंदाजे ८८% व्यक्ती सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करतात. सध्या अस्तित्वात असणारी उपनगरीय रेल व्यवस्था मुंबईकरांच्या दळणवळणासाठी खूप महत्त्वाची आहे. दररोज ६० लाखांहूनही जास्त व्यक्ती या सेवेचा उपयोग करतात. यात बेस्ट बस सेवा, मुंबई उपनगरी रेल्वे समाविष्ट आहेत. आत्तापर्यंत मुंबईतील भौगोलिक आणि आर्थिक बाधांमुळे या सुविधा मागणीनुसार वाढू शकलेल्या नाहीत.

मुंबई उपनगरी रेल्वे एकोणिसाव्या शतकातच सुरू झालेली आहे पण ती जलद परिवहनासाठी बांधली गेलेली नही. मे २००३मध्ये मुंबई जलद परिवहन योजनेत मूलभूत बदल केले गेले व त्यात अंधेरी ते घाटकोपर यांमध्ये १० कि.मी. हलक्या रेल्वेमार्गाचा समावेश केला गेला. जानेवारी २००४ मध्ये एम.एम.आर.डी.ए. या संस्थेने आपली विकासयोजना जाहीर केली, ज्यात १४६ कि.मी.चा भुयारी रेल्वेमार्ग शामील होता. या १४६ कि.मी. मधील ३२ कि.मी. भाग भूमिगत असणार होता. जून २००४ मध्ये १३ स्थानके असलेला एक मेट्रो रेल मार्ग बांधण्यास सरकाराने अनुमती दिली. मुंबई मेट्रोचा भूमिपूजन सोहळा जून २१, इ.स. २००६ रोजी झाला. वेसावे-अंधेरी-घाटकोपर या ११ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे बांधकाम जवळजवळ दीड वर्षानंतर, फेब्रुवारी ८ इ.स. २००८ रोजी सुरू झाले.

योजना संपादन

मुंबई मुख्य उद्देश म्हणजे मुंबईत साधारण १-२ कि.मी. अंतरावर स्थानक असलेला रेल्वेमार्ग आधारित सार्वजनिक जलद परिवहन उपलब्ध करून देणे व ज्या क्षेत्रांत उपनगरीय रेल्वे नाही, तेथे ही सेवा उपलब्ध करणे व तसेच, त्या क्षेत्रांना एकत्र जोडणे. या योजनेत ३ टप्पे आहेत:

मार्गटर्मिनलसुरुवातलांबीस्थानके
भुयारीउन्नतजमिनीवरभुयारीउन्नतजमिनीवर
मार्ग १वर्सोवाघाटकोपर8 जून 20140 km11.4 km0 km0120
मार्ग २दहिसरमानखुर्दकंत्राट40.2 km0 km0 km36[१]00
मार्ग ३कुलाबासीप्झकंत्राट33 km0 km0 km2601

तंत्रज्ञान संपादन

घाटकोपर स्थानकावर येत असलेली मेट्रो

गाड्या संपादन

या प्रकल्पासाठी गाड्या पुरवण्यासाठी कावासाकी, सीमेन्स, ॲल्स्टॉम, बोम्बार्डिये व सी.एस.आर. नांजिंग या कंपन्यांनी तयारी दाखवली होती. पैकी सी.एस.आर. नांजिंगची निवड करण्यात आली.[२] सुरुवातीला सी.एस.आर. नांजिंगला ४ डब्यांच्या १६ गाड्या पुरवण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. यांची किंमत अंदाजे ६ अब्ज रुपये असेल. मेट्रोमार्गावर धावणाऱ्या या गाड्या वातानुकूलित असतील व त्यांमध्ये ब्लॅक-बॉक्स, सी.सी.टी.व्ही., यात्री-चालक संपर्क प्रणाली, दृक-श्राव्य माहिती प्रणाली, मार्गाचा इलेक्ट्रॉनिक नकाशा, अपंगांसाठीच्या सुविधा, इ. आधुनिक सुविधा असतील. साधारणतः चार डब्यांची असलेली प्रत्येक गाडी १५०० माणसं नेऊ शकेल. या गाड्या तयार करताना दिल्लीहाँग काँग शहरांतील भुयारी रेल्वे कंपन्यांकडून सल्ला घेण्यात आला आहे.

क्षमता संपादन

मेट्रोच्या गाड्यांची क्षमता
चालक डबासाधारण डबा४ डब्यांची गाडी६ डब्यांची गाडी८ डब्यांची गाडी
साधारण अवस्थागर्दीतसाधारण अवस्थागर्दीतगर्दीतगर्दीतगर्दीत
बसलेले४३४३५०५०१८६२८६३८६
उभे१२०२३९१२९२५७९९२१५०६२०२०
एकूण१६३२८२१७९३०७११७८१७९२२४०६
क्षमता (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्ग)
२०११२०२१२०३१
एका गाडीत असलेले डबे
पुढच्या गाडीसाठी लागणारा वेळ (मिनिटांत)
PHPDT क्षमता मागणूक१५५६३२३५९०३०५४७
PHPDT उपलब्ध क्षमता१४१३६१७६७०२३५६०
क्षमता (चारकोप-वांद्रे-मानखुर्द मार्ग)
२०११२०२१२०३१
एका गाडीत असलेले डबे
पुढच्या गाडीसाठी लागणारा वेळ (मिनिटांत)३.५३.५
PHPDT क्षमता मागणूक२६४३२३६२०८४२४०९
PHPDT उपलब्ध क्षमता२००२६३०४६४३५८४०

वीज पुरवठा संपादन

मेट्रोच्या पहिल्या मार्गाच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी 'ए.बी.बी. ग्रुप' या संघटनेला देण्यात आली आहे. वीज पुरवठा, वीज वितरण, कर्षण विद्युतीकरण व एस्.सी.ए.डी.ए., या सर्व प्रणाल्यांचे आपूर्ती, निर्माण, परीक्षण व कमिशनिंगचे काम हे संघटन करणार आहे.

संकेतन व संचार संपादन

सिग्नाल्लिंग प्रणाली सेमैंसने पुरवली असून, संचार प्रणाली थेलसने पुरवली आहये.

बाह्य दुवे संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ http://www.thehindubusinessline.com/news/states/maharashtra-govt-clears-metro-projects/article6618208.ece?ref=relatedNews
  2. ^ "Mumbai Metro One Project updates". Mumbaimetro1.com. 2010-08-25 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजअहिल्याबाई होळकरमुखपृष्ठविशेष:शोधामनुस्मृतीनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक२०१९ लोकसभा निवडणुका२०२४ लोकसभा निवडणुकावर्ग:उझबेकिस्तानमधील शहरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानसंत तुकारामबापू वाटेगावकरज्ञानेश्वरलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविठ्ठल मंदिर (पंढरपूर)विनायक दामोदर सावरकरदिशाजून १महाराष्ट्रामधील जिल्हेमुक्ताबाईशिवाजी महाराजांची राजमुद्रागौतम बुद्धखासदारजागतिक दिवसआईमहाराष्ट्रसंभाजी भोसलेमटकामराठी भाषारायगड (किल्ला)नातीपसायदानसुषमा अंधारे