बाल्टिमोर


बाल्टिमोर (इंग्लिश: Baltimore) हे अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलॅंड प्रांताच्या पूर्व-मध्य भागात अटलांटिक महासागराच्या चेसापीक ह्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बाल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.पासून केवळ ४० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावरील बाल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ जगातील एक आघाडीचे संशोधन विद्यापीठ आहे.

बाल्टिमोर
Baltimore
अमेरिकामधील शहर


ध्वज
बाल्टिमोर is located in मेरीलँड
बाल्टिमोर
बाल्टिमोर
बाल्टिमोरचे मेरीलँडमधील स्थान
बाल्टिमोर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बाल्टिमोर
बाल्टिमोर
बाल्टिमोरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°17′N 76°37′W / 39.283°N 76.617°W / 39.283; -76.617

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मेरीलॅंड
स्थापना वर्ष इ.स. १७२९
क्षेत्रफळ २३८.४ चौ. किमी (९२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३ फूट (१० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,२०,९६१
  - घनता २,६०४.७ /चौ. किमी (६,७४६ /चौ. मैल)
  - महानगर २६,९०,८८६
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
baltimorecity.gov

एकेकाळी अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर व एके काळी एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बाल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये ऱ्हास झाला आहे परंतु येथील व्यवसायाचे स्वरूप उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगांचे काही अंशी पुनरुज्जीवन होत आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ ९२.०५ चौरस मैल (२३८.४ चौ. किमी) इतके आहे व त्यापैकी ११.११ चौरस मैल (२८.८ चौ. किमी) एवढा भाग जलव्याप्त आहे.

इतिहास संपादन

बाल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलॅंड वसाहतीमधील एक बंदर म्हणून झाली. ह्या शहराला मेरीलॅंड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बाल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या अमेरिकन क्रांतीदरम्यान बाल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बाल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९०४ रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते, परंतु नंतरच्या काळात पुन्हा उभारले गेले.

हवामान संपादन

बाल्टिमोरचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे उष्ण व दमट असतात.

बाल्टिमोर बंदर साठी हवामान तपशील
महिनाजानेफेब्रुमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंवर्ष
सरासरी कमाल °फॅ (°से)44.1
(6.7)
47.3
(8.5)
56.8
(13.8)
67.8
(19.9)
77.2
(25.1)
86.0
(30)
90.6
(32.6)
88.2
(31.2)
80.9
(27.2)
69.7
(20.9)
58.7
(14.8)
48.5
(9.2)
67.98
(19.99)
सरासरी किमान °फॅ (°से)29.4
(−1.4)
31.3
(−0.4)
39.0
(3.9)
48.2
(9)
58.2
(14.6)
67.7
(19.8)
72.7
(22.6)
70.8
(21.6)
63.7
(17.6)
51.6
(10.9)
42.1
(5.6)
33.5
(0.8)
50.68
(10.38)
सरासरी वर्षाव इंच (मिमी)3.05
(77.5)
2.90
(73.7)
3.90
(99.1)
3.19
(81)
3.99
(101.3)
3.46
(87.9)
4.07
(103.4)
3.29
(83.6)
4.03
(102.4)
3.33
(84.6)
3.30
(83.8)
3.37
(85.6)
४१.८८
(१,०६३.९)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी)6.8
(17.3)
8.0
(20.3)
1.9
(4.8)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.4
(1)
3.1
(7.9)
20.2
(51.3)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in)10.89.310.410.211.510.010.09.18.48.28.99.7116.5
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in)3.72.71.30000000.51.59.7
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास155.0166.7213.9231.0254.2276.0291.4263.5222.0204.6159.0145.7२,५८३
स्रोत: NOAA,[१] HKO[२] idcide,[३] intellicast,[४]

जनसांख्यिकी संपादन

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्षलोक.±%
इ.स. १७९०१३,५०३
इ.स. १८००२६,५१४+९६%
इ.स. १८१०४६,५५५+७५%
इ.स. १८२०६२,७३८+३४%
इ.स. १८३०८०,६२०+२८%
इ.स. १८४०१,०२,३१३+२६%
इ.स. १८५०१,६९,०५४+६५%
इ.स. १८६०२,१२,४१८+२५%
इ.स. १८७०२,६७,३५४+२५%
इ.स. १८८०३,३२,३१३+२४%
इ.स. १८९०४,३४,४३९+३०%
इ.स. १९००५,०८,९५७+१७%
इ.स. १९१०५,५८,४८५+९%
इ.स. १९२०७,३३,८२६+३१%
इ.स. १९३०८,०४,८७४+९%
इ.स. १९४०८,५९,१००+६%
इ.स. १९५०९,४९,७०८+१०%
इ.स. १९६०९,३९,०२४−१%
इ.स. १९७०९,०५,७५९−३%
इ.स. १९८०७,८६,७७५−१३%
इ.स. १९९०७,३६,०१४−६%
इ.स. २०००६,५१,१५४−११%
इ.स. २०१०६,२०,९६१−४%

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बाल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.[५] दुसऱ्या महायुद्धानंतर बाल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बाल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या बाल्टिमोरमधील ६३.२ टक्के लोक आफ्रिकन वंशाचे आहेत.

अर्थव्यवस्था संपादन

वाहतूक संपादन

बाल्टिमोर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोठे बंदर आहे. बाल्टिमोर थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील मुख्य विमानतळ असून डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ येथून जवळ आहेत.

खेळ संपादन

बाल्टिमोर महानगरात खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ आहेत.

संघखेळलीगस्थानस्थापना
बॉल्टिमोर रेव्हन्सअमेरिकन फुटबॉलनॅशनल फुटबॉल लीगएम ॲन्ड टी बँक स्टेडियम१९९६
बॉल्टिमोर ओरियोल्सबेसबॉलमेजर लीग बेसबॉलओरियोल पार्क१९५४

शहर रचना संपादन

बाल्टिमोर बंदर
रात्रीच्या वेळी बाल्टिमोर बंदर

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ संपादन

  1. ^ "The New 1981–2010 Climate Normals" (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. August 2011. August 8, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: date and year (link)
  2. ^ "Climatological Normals of Baltimore". Hong Kong Observatory. Archived from the original on 2012-03-19. June 14, 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Average Temperatures for Baltimore, MD (Inner Harbor)". NOAA. November 22, 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "Climatological Data for Baltimore, MD (Inner Harbor)". NOAA. November 22, 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "1830 Fast Facts: 10 Largest Urban Places". U.S. Census Bureau. March 29, 2011 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण