चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MAAआप्रविको: VOMM) (तमिळ: சென்னை பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या चेन्नई शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेन्नई विमानतळ चेन्नई महानगराच्या दक्षिण भागात तिरुसुलम, मीनांबक्कम व पल्लावरम ह्या तीन उपनगरांमध्ये स्थित आहे. २०१४ साली १.३८ प्रवाशांची वाहतूक करणारा चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतामधील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. ह्या विमानतळाच्या देशांतर्गत सेवेसाठी वापरात असलेल्या टर्मिनलला के. कामराज ह्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्याचे तर आंतरराष्ट्रीय टर्मिनलला सी.एन. अण्णादुराईचे नाव देण्यात आले आहे. भारतामधील अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपनींचे प्रमुख वाहतूकतळ चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दक्षिण क्षेत्राचे मुख्यालय देखील येथेच स्थित आहे.

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ
சென்னை பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்
आहसंवि: MAAआप्रविको: VOMM
MAA is located in चेन्नई
MAA
MAA
चेन्नईमधील स्थान
MAA is located in तमिळनाडू
MAA
MAA
तमिळनाडूमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारपब्लिक
मालकभारत सरकार
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवाचेन्नई महानगर
स्थळतिरुसुलम, तमिळनाडू, भारत
हब
समुद्रसपाटीपासून उंची52 फू / 16 मी
गुणक (भौगोलिक)12°58′56″N 80°9′49″E / 12.98222°N 80.16361°E / 12.98222; 80.16361
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
07/2512,0013,658डांबरी
12/306,7082,045डांबरी-कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी१,३८,११,१९१
सामान वाह्तुक टनामध्ये३,००,४९७
विमान१,२४,७१२
स्रोत: भाविप्रा,[१][२]

इतिहास संपादन

मीनांबक्कम येथील जुने टर्मिनल/विमानतळ

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाहुन १९५४ मध्ये एर इंडियाचे पहिले उड़्डाण मुंबई करिता बेळगाव मार्गे झाले होते. पहिला विमान टर्मिनल हवाई पट्टीच्या ईशान्य बाजूस बांधण्यात आले होते, की जे मीनांबक्कमउपनगराच्या बाजूने होते, त्यामूळे ह्या विमानतळाचे नाव मीनांबक्कम विमानतळ असे पडले. कालांतराने तिरूसुलम मध्ये नवीन टर्मिनल बांधण्यात आले व येथून नवीन प्रवासी सुविधा सुरू करण्यात आल्या. जुन्या मीनांबक्कम टर्मिनल इमारतीचा वापर सध्या मालवाहतूकीसाठी करण्यात येतो.

स्थापत्यप्रकार संपादन

चेन्नई विमानतळ/रात्रीचे दृश्य

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तीन टर्मिनल आहेत. मीनांबक्कम येथील जुने टर्मिनल आता मालसामानासाठी वापरले जाते तर तिरुसुलम येथील अंदर्देशीय व आंतरराष्ट्रीय अशी दोन नवीन टर्मिनल प्रवासी वापरता. यांना कामराज टर्मिनल आणि अण्णा टर्मिनल अशी नावे आहेत. ही दोन प्रवासी टर्मिनल जोडलेली आहेत.

परिवहन दुवे संपादन

चेन्नई विमानतळ राष्ट्रीय महामार्ग ४५ ह्या महामार्गावर स्थित आहे ह्यामुळे रस्त्याद्वारे ह्या विमानतळावर पोचणे सुलभ होते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे तिरुसुलम हे स्थानक देखील येथून जवळच स्थित आहे. बांधकाम चालू असलेल्या चेन्नई मेट्रोचा मार्ग १ चे दक्षिणेकडील टोक येथेच आहे. मेट्रोद्वारे हा विमानतळ चेन्नईमधील बहुतेक सर्व महत्त्वाच्या स्थळांसोबत जोडला जाईल.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने संपादन

प्रवासी सेवा संपादन

येथे थांबलेले स्पासजेटचे बोईंग ७३७ विमान
विमान कंपनीगंतव्य स्थानटर्मिनल
एर अरेबियाशारजाअण्णा
एरएशियाक्वालालंपूरअण्णा
एरएशिया इंडियाबंगळूरकामराज
एर ऑस्ट्रालबँकॉक, सेंट डेनिस (रेयूनियों)अण्णा
एर कोस्टाअहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, विजयवाडा, विशाखापट्टणमकामराज
एर इंडियाकोलंबो, दुबई, कुवेत, माले, मस्कत, शारजा, सिंगापूरअण्णा
एर इंडियाअहमदाबाद, बंगळूर, दिल्ली, गोवा, हैदराबाद, कोची, कोलकाता, कोळिकोड, मदुराई, मुंबई, पोर्ट ब्लेअर, तिरुअनंतपुरमकामराज
एर इंडिया एक्सप्रेसक्वालालंपूर, सिंगापूर, तिरुचिरापल्लीअण्णा
एर मॉरिशसमॉरिशसअण्णा
ब्रिटिश एरवेझलंडनअण्णा
कॅथे पॅसिफिकहाँग काँगअण्णा
एमिरेट्सदुबईअण्णा
एतिहाद एरवेझअबु धाबीअण्णा
फ्लायदुबईदुबईअण्णा
गोएरभुवनेश्वर, मुंबई, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे, रांचीकामराज
गल्फ एरबहरैनअण्णा
इंडिगोदुबई, सिंगापूरअण्णा
इंडिगोअहमदाबाद, बंगळूर, भुवनेश्वर, कोइंबतूर, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोची, कोलकाता, मुंबई, पुणे, रायपूर, तिरुअनंतपुरम, विशाखापट्टणमकामराज
जेट एरवेझअबु धाबी, कुवेत, सिंगापूरअण्णा
जेट एरवेझअमृतसर, बंगळूर, भुवनेश्वर, चंदीगढ, दिल्ली, गोवा, इंदूर, जयपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, पोर्ट ब्लेअर, वडोदराकामराज
जेटकनेक्टअहमदाबाद, बंगळूर, कोइंबतूर, दिल्ली, गोवा, हैदराबाद, इंदूर, कोची, कोलकाता, लखनौ, मदुराई, मंगळूर, मुंबई, रायपूर, तिरुअनंतपुरम, तिरुचिरापल्लीकामराज
कुवेत एरवेझकुवेतअण्णा
लुफ्तान्साफ्रांकफुर्ट विमानतळअण्णा
मलेशिया एरलाइन्सक्वालालंपूरअण्णा
मालदीव्हियनढाका, मालेअण्णा
ओमान एरमस्कतअण्णा
कतार एरवेझदोहाअण्णा
सौदियादम्मम, जेद्दाह, रियाधअण्णा
सिल्कएरसिंगापूरअण्णा
सिंगापूर एरलाइन्ससिंगापूरअण्णा
स्पाइसजेटकोलंबोअण्णा
स्पाइसजेटअहमदाबाद, बागडोगरा, बंगळूर, बेळगाव, कोइंबतूर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हुबळी, हैदराबाद, जयपूर, कोची, कोलकाता, कोळिकोड, मदुराई, मंगळूर, मुंबई, पोर्ट ब्लेअर, पुणे, सुरत, तिरुअनंतपुरम, तुतिकोरिन, विजयवाडा, विशाखापट्टणमकामराज
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबो, हंबन्टोटाअण्णा
थाई एरवेझबँकॉकअण्णा
टायगरएरसिंगापूरअण्णा

अपघात व दुर्घटना संपादन

ऑगस्ट १९८४मध्ये विमानतळापासून १.२ किमी अंतरावर झालेल्या बॉम्बस्फोटात ३३ व्यक्ति ठार तर २७ जखमी झाले होते.[३]

संदर्भदुवे संपादन

  1. ^ "TRAFFIC STATISTICS - DOMESTIC & INTERNATIONAL PASSENGERS" (jsp). Aai.aero. 31 December 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "TRAFFIC STATISTICS - DOMESTIC & INTERNATIONAL PASSENGERS" (html). Aai.aero. 31 December 2014 रोजी पाहिले.
  3. ^ चेन्नई बॉम्बस्फोटाबद्दल ईलम सेनेच्या सेनापतीला अटक Archived 2009-10-07 at the Wayback Machine., द इंडियन एक्सप्रेस न्यूझ सर्व्हिस, फेब्रुवारी ८, इ.स. १९९८

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजअहिल्याबाई होळकरमुखपृष्ठविशेष:शोधामनुस्मृतीनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक२०१९ लोकसभा निवडणुका२०२४ लोकसभा निवडणुकावर्ग:उझबेकिस्तानमधील शहरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानसंत तुकारामबापू वाटेगावकरज्ञानेश्वरलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविठ्ठल मंदिर (पंढरपूर)विनायक दामोदर सावरकरदिशाजून १महाराष्ट्रामधील जिल्हेमुक्ताबाईशिवाजी महाराजांची राजमुद्रागौतम बुद्धखासदारजागतिक दिवसआईमहाराष्ट्रसंभाजी भोसलेमटकामराठी भाषारायगड (किल्ला)नातीपसायदानसुषमा अंधारे