गिनी-बिसाउ

(गिनी-बिसाव या पानावरून पुनर्निर्देशित)


गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República da Guiné-Bissau) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. गिनी-बिसाउच्या उत्तरेस सेनेगाल, दक्षिण व पूर्वेस गिनी तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. बिसाउ ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

गिनी-बिसाउ
República da Guiné-Bissau
गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक
गिनी-बिसाउचा ध्वजगिनी-बिसाउचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: Unidade, Luta, Progresso (पोर्तुगीज)
राष्ट्रगीत: Esta É a Nossa Pátria Bem Amada
(ही माझी प्रिय मातृभूमी आहे)
गिनी-बिसाउचे स्थान
गिनी-बिसाउचे स्थान
गिनी-बिसाउचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बिसाउ
अधिकृत भाषापोर्तुगीज
सरकारप्रजासत्ताक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस२४ सप्टेंबर १९७३ (पोर्तुगालपासून
 - प्रजासत्ताक दिन१० सप्टेंबर १९७४ 
क्षेत्रफळ
 - एकूण३६,१२५ किमी (१३६वा क्रमांक)
 - पाणी (%)२२.४
लोकसंख्या
 -एकूण१६,४७,००० (१४८वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता४४.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१.९२५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१,११४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.२८९ (कमी) (१६४ वा) (२००८)
राष्ट्रीय चलनपश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक
आय.एस.ओ. ३१६६-१GW
आंतरजाल प्रत्यय.gw
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक२४५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले.

इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे गिनी-बिसाउ गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पनामध्ये गिनी-बिसाउ जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. येथील राजकीय भाषा पोर्तुगीज असली तरीही केवळ १४ टक्के जनता पोर्तुगीज वापरते.


खेळ संपादन

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमहाराष्ट्र दिनकुतुब मिनारमुखपृष्ठअलिप्ततावादी चळवळमुहम्मद बिन तुघलकविशेष:शोधाभारत सरकार कायदा १९३५भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्राचा इतिहासदिशाबाबासाहेब आंबेडकरमराठी भाषानवग्रह स्तोत्रभारतीय स्थापत्यकलागणपती स्तोत्रेदुसरे महायुद्धलोकमान्य टिळकसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्रभारताचे संविधानकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनाटोमनसबदारस्वदेशी चळवळभारतीय रिझर्व बँकसंभाजी भोसलेखासदारशाह जहानभाषावार प्रांतरचनाज्ञानेश्वरसोव्हिएत संघपुणे लोकसभा मतदारसंघसंत तुकारामब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबारामती लोकसभा मतदारसंघशाहू महाराज