केरसुणी

सफाई करायचे यंत्र

केरसुणी हे घर आणि परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी बनते.[१] महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची केरसुणीची पूजा करण्याचा रिवाज आहे. पुण्याला जवळच्याच जुन्नर शहरातून केरसुण्यांचा पुरवठा होतो. औरंगाबाद जवळच्या सोयगाव तालुक्यात शिंदीच्या पानांच्या केरसुण्या बनविणे हा पिढीजात व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. केरसुणी हा कमी भांडवलातून चालणारा व्यवसाय आहे.

केरसुणी आणि सुपली

धार्मिक महत्त्व

संपादन
केरसुणी

दिवाळी उत्सवातील आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. त्या दिवशी अलक्ष्मी घालवून लक्ष्मीचे स्वागत करताना केरसुणी पूजन करण्याची परंपरा महाराष्ट्र राज्यात प्रचलित आहे.[२]



संदर्भ

संपादन
  1. ^ "Diwali 2023 : तांत्रिक युगातही केरसुणीलाच 'लक्ष्मी' म्हणून पूजनाचा मान; कच्चा माल नसल्याने दरवाढ | in modern age Kersuni is worshipped as Lakshmi in diwali jalgaon news". eSakal - Marathi Newspaper. 2023-11-15 रोजी पाहिले.
  2. ^ वृत्तसेवा, प्रभात (2022-10-17). "केरसुणी बनवण्याची लगबग अंतिम टप्प्यात". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2023-11-15 रोजी पाहिले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्रावटपौर्णिमाशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील आरक्षणदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरइतर मागास वर्गज्ञानेश्वरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकाळाराम मंदिर सत्याग्रहभारताचे संविधानरायगड (किल्ला)ऋषीमुंजा (भूत)नालंदा विद्यापीठकबीरपसायदानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमुरलीकांत पेटकरमटकापदवीधर मतदारसंघ