औंध संस्थान

महाराष्ट्रातील एक संस्थान


औंध संस्थान महाराष्ट्रातील एक संस्थान होते. महाराष्ट्रात ते सातारा औंध या नावाने परिचित आहे.औंध संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची स्थापना सन १६९९ या वर्षी झाली.या संस्थानाची पूर्वीची राजधानी कराड ही होती.

औंध संस्थान
[[मराठा साम्राज्य|]] इ.स. १६९९इ.स. १९४८
ध्वज
राजधानी औंध
सर्वात मोठे शहर औंध
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: श्री परशुराम त्रिंबक पंत प्रतिनिधी (इ.स.१६९७-१७१७)
अंतिम राजा: श्री भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी (इ.स. १९३७-४७)
पंतप्रधान परशुरामराव पंत (इ.स.१९४४-१९४८)
अधिकृत भाषा मराठी भाषा
लोकसंख्या 58,916 (इ.स.१८८१)
–घनता ४५.४ प्रती चौरस किमी

संस्थानिक

संपादन

औंध संस्थानाची स्थापना परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी केली. ते देशस्थ ब्राह्मण होते.

औंध संस्थानाचे राजे

संपादन
औंध संस्थानाची स्थापना
१६९०[१] / १६९९[२]
राजा पंतप्रतिनिधी (किताब)[१]
पासूनपर्यंतनावजन्ममृत्यू
इ.स. १६९७मे २७, इ.स. १७१८परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधीइ.स. १६६०इ.स. १७१८
इ.स. १७१८नोव्हेंबर २५, इ.स. १७४६श्रीनिवासराव परशुराम "श्रीपतराव" पंतप्रतिनिधीइ.स. १७४६
इ.स. १७४६इ.स. १७५४जगजीवनराव परशुराम पंतप्रतिनिधी
इ.स. १७५४एप्रिल ५, इ.स. १७७६श्रीनिवासराव गंगाधर पंतप्रतिनिधीइ.स. १७७६
इ.स. १७७६ऑगस्ट ३०, इ.स. १७७७भवानराव पंतप्रतिनिधीइ.स. १७७७
ऑगस्ट ३०, इ.स. १७७७जून ११, इ.स. १८४८परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधीइ.स. १७७७इ.स. १८४८
जून ११, इ.स. १८४८इ.स. १९०१श्रीनिवासराव परशुराम पंतप्रतिनिधी अण्णासाहेबनोव्हेंबर २७, इ.स. १८३३इ.स. १९०१
इ.स. १९०१इ.स. १९०५परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी "दादासाहेब"फेब्रुवारी १७, इ.स. १८५८इ.स. १९०५
नोव्हेंबर ३, इ.स. १९०५नोव्हेंबर ४, इ.स. १९०९गोपाळकृष्णराव परशुराम पंतप्रतिनिधी नानासाहेब
नोव्हेंबर ४, इ.स. १९०९ऑगस्ट १५, इ.स. १९४७भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी बाळासाहेबऑक्टोबर २४, इ.स. १८६८एप्रिल १३, इ.स. १९५१
पंतप्रधान[१]
पासूनपर्यंतनावजन्ममृत्यू
इ.स. १९४४इ.स. १९४८परशुराम राव पंतसप्टेंबर ११, इ.स. १९१२ऑक्टोबर ५, इ.स. १९९२

भवानराव पंतप्रतिनिधी

संपादन

औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खेडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता.या संस्थानमधील श्री.श्री.विद्यालयातून साने गुरुजी ,ग.दि.माडगूळकर,व्यंकटेश माडगूळकर,शंकरराव खरात,मधुकर पाठक (चित्रपट क्षेत्रातील)यांनी शिक्षण घेतले.

स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वतः सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत . त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले.भवानरावांनी ‘बिन भिंतीचा तुरुंग’ ही मॉरिस फ्रेडमन नावाच्या आयरिश माणसाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. उघड्यावर असलेली ती खुनी गुन्हेगारांची वसाहत पुढे ‘स्वतंत्रपूर’ या नावाने ओळखली जाऊ लागली. व्ही.शांताराम यांनी याच संकल्पनेवर ‘दो ऑंखे बारा हाथ’ नावाचा हिंदी चित्रपट काढला. हा चित्रपट जगभरात नावाजला गेला.आजही आटपाडी येथे 'बिन भिंतीचा तुरुंग 'आहे .

भवानरावांना साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. दर वर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. ते स्वतः चित्रकार होते .त्यांनी काढलेली चित्रे औंधच्या संग्रहालयात आजही आहेत.त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्त्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय उभारले.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b c Worldstatesmen.org Indiase prinsen A-J
  2. ^ Encyclopædia Britannica, eleventh edition (1910-1911)
🔥 Top keywords: वटपौर्णिमाक्लिओपात्राआंतरराष्ट्रीय योग दिनमुखपृष्ठशिवाजी महाराजवडविशेष:शोधायोगनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगणपती स्तोत्रेदिशाशाहू महाराजमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रनालंदा विद्यापीठसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरजागतिक दिवसभारताचे संविधानसावित्री आणि सत्यवानरायगड (किल्ला)योगासनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुंजा (भूत)पसायदानवट सावित्रीपांडुरंग सदाशिव सानेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकइतर मागास वर्गनामदेवमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीउंट