ईदी अमीन (१९२५ - १६ ऑगस्ट २००३) हा मध्य अफ्रिकेतील युगांडा देशाचा लष्करी हुकूमशाह व तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ह्याचा कार्यकाल १९७१ ते १९७९ इतका राहिला. ईदी अमीन यांची कारकीर्द ब्रिटीश सैन्यात १९४६ मध्ये भरती झाल्यापासून झाली व स्वातंत्र्यानंतर त्यांची बढती मेजर जनरल या पदापर्यंत झाली, १९७१ मध्ये त्याने मिल्टन ओबोटे यांचे सरकार उलथवून टाकत सत्ता हातात घेतली. ईदी अमीनचा राज्यकाल अनेक वाईट कारणांसाठी कायमचा लक्षात राहिला. मानवी मूल्यांची तुडवणूक,राजकीय बंदी, अनेक विवादास्पद राजकीय हत्या व भारतीयांची युगांडातून हकालपट्टी हे ह्यांमधील प्रमुख विषय होते. अमीनच्या कार्यकालात अंदाजे ५ लाख लोकांची हत्या करण्यात आली. लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड हा चित्रपट ईदी अमीन यांच्यावर आधारित आहे. फॉरेस्ट व्हिटेकर ह्याने ईदी अमीनची भूमिका केली आहे.

ईदी अमीन

युगांडा ध्वज युगांडाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ जानेवारी १९७१ – ११ एप्रिल १९७९
मागीलमिल्टन ओबोटे
पुढीलगॉडफ्रे विनैसा

जन्मइ.स. १९२५
कोबोको
मृत्यू१६ ऑगस्ट २००३
जेद्दाह, सौदी अरेबिया
राजकीय पक्षफेडरलिस्ट पार्टी
धर्मइस्लाम
सहीईदी अमीनयांची सही
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजपंकजा मुंडेबाबासाहेब आंबेडकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविशेष:शोधामुखपृष्ठबच्चू कडूगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रसोनेभारताचे संविधानपरभणी लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेसंभाजी भोसलेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभावर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षखासदारपुणे लोकसभा मतदारसंघशरद पवारस्वामी समर्थमहाराष्ट्र दिनमटकामहाराष्ट्रामधील जिल्हेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंत तुकाराममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजागतिक दिवसरक्षा खडसेनितीन गडकरी