भारत सरकार

भारतच्या प्रजासत्ताकाचे संवेधानिक सरकार

भारत सरकार (इंग्लिश: Government of India) हे भारताच्या प्रजासत्ताकाचे संवैधानिक सरकार आहे. केंद्र सरकार ह्या नावाने देखील ओळखले जाणारे भारत सरकार भारतामधील २८ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेशांचे सर्वभौम प्रशासक आहे. भारत सरकारचे काम राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथून चालते.

भारत सरकार
स्थापना15 ऑगस्ट 1947; 76 वर्षां पूर्वी (1947-०८-15)
देशभारतीय गणराज्य
संकेतस्थळindia.gov.in
स्थानराष्ट्रपती भवन
भारतीय संसद
संसदभारतीय संसद
वरिष्ठ सभागृहराज्यसभा
सभापती राज्यसभाजगदीप धनखड (भारतीय जनता पक्ष)
उपसभापती राज्यसभाहरिवंश नारायण सिंग (जनता दल (युनायटेड))
सभागृह नेते राज्यसभापीयूष गोयल (भारतीय जनता पक्ष)
(ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री भारत)
सभागृह उपनेते राज्यसभाधर्मेंद्र प्रधान (भारतीय जनता पक्ष)
(शिक्षण मंत्री भारत)
विरोधी पक्षनेते राज्यसभामल्लिकार्जुन खरगे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
उप विरोधी पक्षनेते राज्यसभाप्रमोद तिवारी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
कनिष्ठ सभागृहलोकसभा
अध्यक्ष लोकसभाओम बिर्ला (भारतीय जनता पक्ष)
उपाध्यक्ष लोकसभारिक्त
सभागृह नेते लोकसभानरेंद्र मोदी (भारतीय जनता पक्ष)
(भारताचे पंतप्रधान)
सभागृह उपनेते लोकसभाराजनाथ सिंग (भारतीय जनता पक्ष)
(संरक्षणमंत्री भारत)
विरोधी पक्षनेते लोकसभा
व नेते राष्ट्रीय काँग्रेस लोकसभा प्रमुख विरोधी पक्ष
अधीर रंजन चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
उप विरोधी पक्षनेते लोकसभा
व उपनेते राष्ट्रीय काँग्रेस लोकसभा प्रमुख विरोधी पक्ष
गौरव गोगोई (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
बैठक स्थानसंसद भवन
कार्यकारी
राष्ट्रप्रमुखद्रौपदी मुर्मू (भारतीय जनता पक्ष)
(भारताचे राष्ट्रपती)
शासनप्रमुखनरेंद्र मोदी (भारतीय जनता पक्ष)
(भारताचे पंतप्रधान)
शासन उपप्रमुखरिक्त
(भारताचे उपपंतप्रधान)
मुख्य विभागभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ
नागरी सेवा प्रमुखराजीव गौबा भारतीय प्रशासकीय सेवा
(भारताचे कैबिनेट सचिव)
बैठक स्थानमंत्रालय, मुंबई
मंत्रालय (शासन विभाग)५८
याला उत्तरदायीलोकसभा
न्यायमंडळ
न्यायालयभारताचे सर्वोच्च न्यायालय
सरन्यायाधिशधनंजय यशवंत चंद्रचूड

संसद संपादन

भारताचे सरकार संसदीय राज्यपद्धतीनुसार चालते ज्यामध्ये भारताची संसद देशाचे सर्व कायदे ठरवते व बव्हंशी कामकाज पाहते. संसदेची दोन सदने आहेत.

  • लोकसभा - ह्यामधील ५४३ सदस्य निवडणुकीमध्ये थेट नागरिकांद्वारे निवडले जातात.
  • राज्यसभा - ह्यामधील २४५ सदस्य अप्रत्यक्षपणे राज्य व केंद्रशासीत प्रदेश विधिमंडळांद्वारे निवडले जातात.

भारताचे पंतप्रधान तसेच केंद्रीय मंत्रिमंडळामधील सर्व सदस्यांना संसद सदस्य असणे बंधनकारक आहे.

कार्यकारिणी शाखा संपादन

राष्ट्रपती संपादन

राष्ट्रपती हा भारताचा राष्ट्रप्रमुख असून संविधानाच्या कलम ५३ (१) अन्वये त्याला अनेक अधिकार दिले गेले आहेत. राष्ट्रपतीचे कामकाज पंतप्रधानाच्या सल्ल्याने चालत असून त्याचे बहुतेक हक्क केवळ औपचारिक स्वरूपाचे आहेत. खालील महत्त्वाच्या पदांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

उपराष्ट्रपती संपादन

उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा वरिष्ठ नेता असून राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत कारभार संभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.

मंत्रीमंडळ संपादन

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान व ३५ कॅबिनेट मंत्री असतात.

हे ही पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाजी.ए. कुलकर्णीरामायणसूर्यबाबासाहेब आंबेडकरजागतिक तापमानवाढदशरथशाश्वत विकासनवग्रह स्तोत्रसमुद्रमंथनदिशाभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभगवद्‌गीतागणपती स्तोत्रेसुषमा अंधारेवाल्मिकी ऋषीजैवविविधताभारताचे संविधाननाशिक लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनाखासदारदिंडोरी लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेमहाराष्ट्रामधील जिल्हेचिपको आंदोलनसंत तुकारामलोकसभासांडपाणी शुद्धीकरणअभिजात भाषामहाराष्ट्रगौतम बुद्धपाणलोट क्षेत्रज्ञानेश्वरमराठी भाषा