हॉकर हरिकेन

हॉकर हरिकेन हे ब्रिटिश बनावटीचे लढाऊ विमान आहे. एक इंजिन आणि एक वैमानिक असलेले हे विमान १९३५-४४ दरम्यान तयार केले गेले. दुसऱ्या महायुद्धात व नंतर रॉयल एर फोर्स, रॉयल नेव्ही आणि सोवियेत वायुसेनेने या विमानाचा वापर केला. या प्रकारची एकूण १४,583 विमाने तयार केली गेली.[१] यांपैकी १७ विमाने अजूनही उड्डाण करण्याच्या स्थितीत आहेत.

दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेले एक हॉकर हरिकेन विमान

बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये हरिकेन आणि सुपरमरीन स्पिटफायर विमानांनी लुफ्तवाफेच्या सरस असलेल्या मेसरश्मिट १०९ प्रकारांच्या विमानांशी झुंज घेउन लुफ्तवाफेला हवाई नियंत्रण मिळू दिले नाही.

  1. ^ "Hawker Hurricane – Great Britain". The Aviation History On-Line Museum. Retrieved: 17 January 2011.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रहरीणगणपती स्तोत्रेमुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकररक्षा खडसेप्रणिती शिंदेरायगड (किल्ला)मटकापवन कल्याणसांगली जिल्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरभारताचे संविधानबापू वाटेगावकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमराठी भाषामहाराष्ट्रशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसांगलीकेंद्रीय वक्फ परिषदगोवा क्रांती दिननवनीत राणारत्‍नागिरी जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशरद पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंभाजी भोसले