सक्रिय दीर्घिकीय केंद्रक

सक्रिय दीर्घिकीय केंद्रक (इंग्रजी: Active Galactic Nucleus (AGN), लघुरूप: एजीएन) हा दीर्घिकेच्या केंद्राजवळचा दाट (compact) भाग आहे. याची तेजस्विता विद्युतचुंबकीय वर्णपटाच्या सर्व भागांत किंवा कमीत कमी काही भागांत सरासरीपेक्षा खूप जास्त असते. हे जास्तीचे उत्सर्जन रेडिओ, सूक्ष्मतरंग, अवरक्त, दृश्य, अतिनिल, क्ष-किरण आणि गॅमा किरण या तरंगलांबींमध्ये आढळून आले आहे. ज्या दीर्घिकांमध्ये एजीएन असते अशा दीर्घिकांना सक्रिय दीर्घिका म्हणतात. एजीएन मधील प्रारण त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवराचे वस्तुमान वृद्धिंगत (ॲक्रिशन[श १]) होत असल्याने होते असे मानले जाते. एजीएन विद्युतचुंबकीय प्रारणाचे विश्वातील सर्वात तेजस्वी स्रोत आहेत. त्यांचा वापर अतिशय दूरच्या गोष्टी शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.

एजीएनचे प्रारूप संपादन

संदर्भ संपादन

पारिभाषिक शब्दसूचि संपादन

  1. ^ ॲक्रिशन (इंग्लिश: accretion) - अतिरिक्त स्तर हळूहळू जमा करून वाढीची प्रक्रिया
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीबिरसा मुंडाप्रतापराव गणपतराव जाधवएकनाथ खडसेविशेष:शोधामुखपृष्ठरामदास आठवलेमहाराणा प्रतापशिवाजी महाराजनरेंद्र मोदीविचित्रवीर्यभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनचिराग पासवानमुंजा (भूत)पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघनिर्मला सीतारामनद्रौपदी मुर्मूदिशासंत तुकारामरोहिणी खडसे-खेवलकरपवन कल्याणभारताचे राष्ट्रपतीनितीन गडकरीप्रणिती शिंदेपीयूष गोयलनवग्रह स्तोत्रखासदारज्ञानेश्वरभारताचे संविधानअनुप्रिया पटेलमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगणपती स्तोत्रेराममोहन एन. किंजरापूमहाराष्ट्र विधानसभाएन. चंद्रबाबू नायडू