श्रीरंगपट्टण

कर्नाटकातील शहर, भारत

श्रीरंगपट्टण हे भारताच्या कर्नाटक राज्यातील छोटे शहर आहे. मंड्या जिल्ह्यात असलेले हे शहर मैसुरू पासून जवळ असून २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,४४८ होती.

विजयनगरच्या साम्राज्याचा भाग असलेले श्रीरंगपट्टण मैसुरूच्या वूडेयार राज्यकर्त्यांच्या ताब्यात आले. सतराव्या शतकात वूडेयारांचा प्रधान हैदर अली याने येथून राज्याचा कारभार चालविला होता. त्याचा मुलगा टिपू सुलतान याने वूडेयारांचे स्वामित्व झुगारून आपल्या नावाने खुदादाद सल्तनत घोषित केल्यावर श्रीरंगपट्टण अधिकृतरीत्या मैसूर संस्थानाची राजधानी झाले. १७९२ साली तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाच्या शेवटी येथे झालेल्या तहानुसार ब्रिटिशांनी टिपू सुलतानाची सत्ता संपुष्टात आणली. १७९९मध्ये टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तसेच निझामाच्या सैन्यांमध्ये घनघोर युद्ध झाले. यात टिपू सुलतान श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यात मृत्यू पावला. हैदर अली व टिपू सुलतानशी निगडीत अशा अनेक इमारती या शहरात आहेत.

श्रीरंगपट्टणमध्ये रंगनाथस्वामीचे मोठे देउळ आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाजी.ए. कुलकर्णीरामायणसूर्यबाबासाहेब आंबेडकरजागतिक तापमानवाढदशरथशाश्वत विकासनवग्रह स्तोत्रसमुद्रमंथनदिशाभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभगवद्‌गीतागणपती स्तोत्रेसुषमा अंधारेवाल्मिकी ऋषीजैवविविधताभारताचे संविधाननाशिक लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनाखासदारदिंडोरी लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेमहाराष्ट्रामधील जिल्हेचिपको आंदोलनसंत तुकारामलोकसभासांडपाणी शुद्धीकरणअभिजात भाषामहाराष्ट्रगौतम बुद्धपाणलोट क्षेत्रज्ञानेश्वरमराठी भाषा