श्रीपाद रघुनाथ जोशी

मराठी लेखक

श्रीपाद रघुनाथ जोशी ( कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२० - २४ सप्टेंबर, इ.स. २००२ हे मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक होते. पुण्याच्या शुभदा प्रकाशनाने कै. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये काढली. त्या व्युत्पत्ती कोशात अरबी, तुर्की, फारसी भांषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी डबल क्राऊन आकाराच्या ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली.

श्रीपाद रघुनाथ जोशी

जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला. महात्मा गांधींशी त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार होता.

जोशींनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी किमान सात महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होती, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतरही केले.

श्रीपाद रघुनाथ जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अखेरचं पर्व (२०००)
  • अनंंता काय रे केलंस हे? (१९६२)
  • अबलांचे आसू (?)
  • आनंदी गोपाळ
  • उर्दूची नवरत्नें
  • उलगाउलग (१९८३) : श्रीपाद जोशींना त्यांचे उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश तयार करताना संबंधितांनी जो मनस्ताप दिला त्याची हकीकत सांगणारे पुस्तक.
  • कस्तुरीचे कण
  • ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन
  • गांधीजी : एक झलक (१९६२)
  • गांधी जीवन प्रसंग
  • ग्यानबाचा गांधीबाबा
  • ग्रामीण विकासाची वाटचाल (१९६२)
  • चिनारच्या छायेत (१९६२)
  • चीनचे आक्रमण व गांधीवाद (१९६३)
  • जिब्रानच्या नीतिकथा
  • जीेवनसुगंध (१९७७)
  • तांबडी माती हिरवे नाड (१९६४)
  • तुरुंगातले दिवस (१९८५)
  • देवाशपथ खरं सांगेन
  • पाथेय
  • भारत भ्रमण (?)
  • मंटोच्या कथा
  • महात्मा गांधी : जीवन आणि शिकवण
  • महात्मा, माय बापू (१९६८)
  • महाराष्ट्राचे समाज सुधारक (१९६९)
  • मी पाहिलेले गांधीजी (पहिली आवृत्ती ३० जानेवारी १९५३) : या पुस्तकातील गांधीजींची भूमिका स्पष्ट करणारा श्रीपाद जोशी यांच्याशी झालेला त्यांचा पत्रव्यवहार फार महत्त्वाचा आहे.
  • मी भूमिपुत्र (१९६६)
  • मुस्लिम सण आणि संस्कार (१९६२)
  • रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र (१९६१)
  • वाळवंटातील चंद्रकोर (१९७७)
  • विचारयात्रा (आत्मकथन, १९९२)
  • विविध भारती (१९६४)
  • श्रीमानस (१९९०)
  • स्थावर

श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले शब्दकोश

संपादन
  • मराठी हिंदुस्तानी कोश (१९४०) : मुख्य संपादक वामनराव चोरघडे : वास्तविक चोरघडे यांनी फक्त मराठी शब्द निवडले होते आणि त्यांना हिंदुस्तानी प्रतिशब्द देण्याचे काम श्रीपाद जोशी आणि माधवराव सावंत यांनी केले होते. या कोशाची किंमत दोन रुपये होती.
  • मराठी हिन्दुस्तानी कोश (सुधारित, १९५२) : पहिल्या कोशावर तुरुंगात बसल्याबसल्या श्रीपाद जोशींनी हा नवा सुधारित कोश तयार केला. जोशी तुरुंगातून १९४४मध्ये सुटले पण कोश त्यानंतर ८ वर्षांनी वर्ध्याच्या हिंदुस्तानी प्रचार समितीने प्रकाशित केला. या कोशात मराठी आणि हिंदुस्तानी या दोनही भाषांतील शब्दांचे व्याकरण दिले होते. मात्र मूळ मराठी शब्द कोणत्या भाषेतून आला त्याचे माहिती नव्हती. हिंदी भाषकांना मराठी उच्चार कळावेत म्हणून च, छ, ज आणि झ खाली जरूर तेव्हा नुक्ते दिले होते. या कोशात १४,००० शब्द होते; कोशाची किंमत साडेचार रुपये होती.
  • विद्यार्थी हिंदी-मराठी कोश (पृष्ठसंख्या २१२, किंमत २ रुपये) : शब्दसंख्या १२,०००; प्रकाशनवर्ष इ.स. १९५०. प्रकाशक - व्होरा आणि कंपनी, मुंबई.
  • हिंदी-मराठी-गुजराती-इंग्रजी कोश : वोरा आणि कंपनीच्या नानूभाई व्होरा यांच्या आग्रहास्तव हाती घेतलेल्या या कोशाचे काम पूर्ण होऊ शकले नाही..
  • अभिनव शब्दकोश : कोशाच्या पहिल्या भागात हिंदी शब्दांना मराठी व हिंदी प्रतिशब्द दिले होते, तर दुसऱ्या भागात मराठी शब्दांना हिंदी प्रतिशब्द दिले होते. या कोशात उर्दू (अरबी-फारसी) शब्दांचा चांगलाच भरणा होता. शिवाय हिंदी-मराठी वाक्‌प्रचार, म्हणी आणि इतर उपयुक्त माहिती कोशात दिली होती. कोशाच्या १९९६ सालापर्यंत एकूण सहा आवृत्त्या निघाल्या. पहिल्या दोन आवृत्त्या व्हीनस प्रकाशनने काढल्या. (१९५८ची आवृत्ती, पृष्ठसंख्या ४१६, किंमत ५ रुपये. १९६८ची आवृत्ती, पृष्ठसंख्या ६१६, किंमत ८ रुपये). त्यानंतर पुण्याच्या शुभदा प्रकाशनने अनुक्रमे १९८७, १९९०, १९९४ व १९९६ साली कोशाची तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी आवृत्ती काढली.
  • उर्दू-मराठी शब्दकोश (प्रकाशन १९६८)
  • बृहत्‌ हिंदी-मराठी शब्दकोश (मार्च १९६५) : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही.
  • बृहत्‌ मराठी-हिंदी शब्दकोश (डिसेंबर १९७१) : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही.
  • उर्दू-मराठी-हिंदी त्रैभाषिक कोश : (१९६२) : हा संपूर्ण कोश श्रीपाद जोशी यांनी एकट्याने केला असला तरी कोशावर त्यांचे नाव संकलन-संपादक म्हणून छापले आहे. या कोशाच्या कामाशी कसलाही संबंध नसलेले, अरबी-फारसीचे अर्धवट ज्ञान असलेले आणि मराठीचे अजिबात ज्ञान नसलेले एक तथाकथित विद्वान डॉ. निजामुद्दीन एस. गोरेकर या माणसाने कोशातल्या शब्दोच्चारांमध्ये दुरुस्त न करता येईल इतकी ढवळाढवळ केली आणि कोशावर स्वतःचे नाव समीक्षक-संपादक म्हणून टाकले. श्रीपाद जोशींना हा कोश प्रकाशनानंतर सहा वर्षांनी पहायला मिळाला, तेव्हा त्यांना कोशातल्या या अक्षम्य चुका दिसल्या. मुद्रण प्रतीचे संपादन व प्रुफे तपासणाऱ्याचे नाव पुस्तकावर समीक्षक संपादक म्हणून छापल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. असे का केले हे विचारले असता, पुण्याच्या हिंदु-ब्राह्मण असलेल्या काय उर्दू येणार असा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने कोशावर एका मुसलमानाचे समीक्षक संपादक म्हणून नाव टाकल्याचा खुलासा महामंडळाने केला! या कोशाची दुसरी आवृत्ती निघाली, त्यावेळी श्रीपाद जोशींना सुचवलेल्या दुरुस्त्या धुडकावून लावून महामंडळाने त्याच जुन्या कोशाचे पुनर्मुद्रण केले.
  • उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश (नितिन प्रकाशन, १९९७) : हा २०,००० शब्दांचा नवा शब्दकोश श्रीपाद जोशींनी बनवला. कोशाची दुसरी आवृत्ती २००१ साली निघाली.
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा