महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४

२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुक ही १३ ऑक्टोबर २००४ रोजी आयोजित करण्यात आलेली निवडणूक होती. याद्वारे महाराष्ट्राची ११वी विधानसभा निवडण्यात आली. निवडणुकीपूर्वी राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसचे लोकशाही आघाडी सरकार होते. मुख्य लढत प्रमुख आघाडी म्हणजे लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पार्टी - शिवसेना यांची युती ह्यांच्या मध्ये होती. इतर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि लोकजनशक्ती पक्ष ह्यांचा समावेश होता. ह्या निवडणुकीत आघाडी सरकारने चुरशीच्या लढतीत युतीचा पराभव करून आपली सत्ता कायम ठेवली. विलासराव देशमुख आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले. ही मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसरी आणि अखेरची कारकीर्द ठरली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४
भारत
१९९९ ←
ऑक्टोबर १३, २००४→ २००९

महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

सुशीलकुमार शिंदे

निर्वाचित मुख्यमंत्री

विलासराव देशमुख

निवडणूक प्रक्रिया आकडेवारी संपादन

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ सदस्यांना निवडण्यासाठी एकूण ६४,५०८ मतदान केंद्रावर ६६,००० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली गेली. एकूण २,६७८ उम्मेदवारांनी ही निवडणूक लढवली ज्यात १,०८३ अपक्ष आणि १५७ महिला उम्मेदवारांचा समावेश होता. एकूण ६,५९,६६,२९६ पात्र मतदारांपैकी ४,१८,२९,६४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशा रीतीने एकूण ६३.४१% मतदान झाले.[१]

निकाल संपादन

निवडणुकीचा निकाल १७ ऑक्टोबर २००४ रोजी घोषित करण्यात आला, ज्यात काँग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून बनवल्या आघाडीला म्हणजेच लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत वेंकय्या नायडूंनी आपला राजीनामा दिला आणि त्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांना पक्षाची कमान मिळाली.

निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सर्वाधिक २१.०६% मते मिळाली. त्यानंतर शिवसेना १९.९७%, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १८.७५% आणि भारतीय जनता पक्षाला १३.६७% मते मिळाली. २८८ सदस्यांच्या विधानसभेत लोकशाही आघाडीने एकत्रितपणे १४१ जागा जिंकल्या. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७१, काँग्रेसने ६९ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) एक जागा जिंकल्या. अशाप्रकारे आघाडीला साधारण बहुसंख्य पाठबळाच्या चार जागा कमी मिळाल्या. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या युतीने ११७ जागा जिंकल्या. त्यात शिवसेना ६२, भाजपा ५४ आणि स्वातंत्र्य भारत पक्षाने (एस टी बी पी) एक जागा जिंकल्या. निवडणुकीच्या निकालामुळे फेकले जाणारे आणखी एक मोठे आश्चर्य म्हणजे बहुजन समाज पार्टीने सर्वाधिक २७२ जागा लढवल्या पण त्यांना एकही जागा जिकता आली नाही.[२] निवडणुकीत १९ अपक्ष उम्मेदवार आणि १२ महिला उम्मेदवार विजयी झाले.[१]

निवडणूक कार्यक्रम संपादन

क्र.घटनादिनांक
कार्यक्रम जाहीर२४ ऑगस्ट २००४
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात१५ सप्टेंबर २००४
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस२२ सप्टेंबर २००४
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस२३ सप्टेंबर २००४
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस२५ सप्टेंबर २००४
निवडणुकीची तारीख१३ ऑक्टोबर २००४
मतमोजणीची तारीख१६ ऑक्टोबर २००४

मतदान संपादन

माहिती संपादन

  • एकूण मतदारसंघ: २८८
  • उमेदवार: २६७८ (पैकी १५७ महिला)
  • मतदारांची एकूण संख्या :
    • पुरुष : ३,४३,७४,३६४
    • महिला : ३,१५,९१,४२८
    • एकूण : ६,५९,६५,७९२
  • मतदान केंद्राची संख्या : ६४,५०८
  • सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :चिमुर - २२ उमेदवार
  • सर्वांत कमी उमेदवार असलेले केंद्र : शिर्डी - २ उमेदवार
  • सर्वाधिक मतदार असलेले केंद्र :
  • सर्वांत कमी मतदार असलेले केंद्र :
  • सर्वाधिक म्हणजे चार महिला उमेदवार असलेला-
  • एकूण मतदान: ६३.४४%

पक्षनिहाय उमेदवार संपादन

पक्षनिहाय उमेदवार
पक्षउमेदवारपक्षउमेदवारपक्षउमेदवार
काँग्रेस१५७भाजप१११बसपा२७२
राष्ट्रवादी१२४भाकप१५माकप१६
शिवसेना१६३समाजवादी पार्टी९५अपक्ष व इतर१,७२५

पक्षनिहाय विजेते संपादन

पक्षनिहाय उमेदवार
पक्षउमेदवारपक्षउमेदवार
काँग्रेस६९भाजप५४
राष्ट्रवादी७१माकप
शिवसेना६२अपक्ष व इतर२९

विभागानुसार संपादन

उत्तर महाराष्ट्र संपादन

विदर्भ संपादन

मराठवाडा संपादन

मुंबई शहर आणि उपनगर संपादन

ठाणे आणि कोकण संपादन

पश्चिम महाराष्ट्र संपादन

पक्षनिहाय मतदान संपादन

महाराष्ट्र
पक्षउमेदवारांची संख्यानिवडलेल्यांची संख्यामतांची संख्या%
भारतीय जनता पक्ष१११५४५७१७२८७१३,६७%
बहुजन समाज पक्ष२७२१६७१४२९४,००%
भारतीय समाजवादी पक्ष१५५९२४२०,१४%
भारतीय समाजवादी पक्ष (मार्क्सिस्ट)१६२५९५६७०,६२%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१५७६९८८१०३६३२१,०६%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१२४७१७८४१९६२१८,७५%
शिव सेना१६३६२८३५१६५४१९,९७%
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक२७४७०,०१%
जनता दल (Secular)३४२४२७२००,५८%
जनता दल (संघटित)१७१६८९१०,०४%
भारतीय संघटना मुस्लिम लीग३४२०,००%
राष्ट्रीय लोकदल१२९५३८०,०२%
समाजवादी पक्ष९५४७१४२५१,१३%
अखिल भारतीय हिंदुमहासभा१८१४९१४०,०४%
अखिल भारतीय सेना२०६९९८६०,१७%
अपना दल१०५३०,००%
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (सुभाषवादी)१११३०,००%
अखिल भारतीय क्रांतिकारी काँग्रेस१५२७०,००%
आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष२११३२८२०,०३%
भारिप बहुजन महासंघ८३५१६२२११,२३%
भारतीय अल्पसंख्य सुरक्षा महासंघ२२३०,००%
बहुजन महासंघ पक्ष२०४७८०,०५%
भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष७२१०,००%
गोंदवना गणतंत्र पक्ष३०५८२८८०,१४%
हिंदू एकता आंदोलन पक्ष२७३०,००%
हिंदुस्थान जनता पक्ष१८३२०,००%
भारतीय न्याय पक्ष७१५३०,०२%
भारतीय मुस्लिम लीग संघटना (dissident group)१११०,००%
जनता पक्ष१४९७०,००%
जनसुराज्य शक्ती१९३६८१५६०,८८%
क्रांतिकारी जयहिंद सेना१४१०६८३०,०१%
लोक जनशक्ती पक्ष३३३०१८००,०७%
लोकराज्य पक्ष१६७३८०,०४%
महाराष्ट्र राजीव काँग्रेस५८६०,००%
महाराष्ट्र सेक्युलर आघाडी४५७०,००%
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष१५९५०९०,०२%
नागविदर्भ आंदोलन समिती२९४९९०,०७%
नेटिव्ह पीपल्स पक्ष३१५०,००%
जन रिपब्लिकन पक्ष५५७३८०६०,१८%
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष२११२५०१०,०३%
भारतीय शेतकरी कामगार पक्ष४३५४९०१०१,३१%
भारतीय रिपब्लिकन पक्ष६२५३१०,१५%
भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)२०२०६१७५०,४९%
भारतीय रिपब्लिकन पक्ष (लोकशाहीवादी)१८१२०९४०,०३%
भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)८६६०,००%
राष्ट्रीय सामाजिक नायक पक्ष१००८७०,०२%
राष्ट्रीय समाज पक्ष३८१४४७५३०,३५%
सचेत भारत पक्ष३७८०,००%
समाजवादी जनता पक्ष(महाराष्ट्र)२५८६६०,०६%
समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)४७३०,००%
स्वतंत्र भारत पक्ष१७६०२२०,४२%
शिवराज्य पक्ष३७२८०७१०,०७%
सवर्ण समाज पक्ष२६२०,००%
समाजवादी जन परिषद५४५०,००%
विदर्भ जनता काँग्रेस७४१७०,०२%
विदर्भ राज्य पक्ष१०६१५७०,०१%
भारतीय वुमनिस्ट पक्ष५२१५०,०१%
अपक्ष१०८३१९५८७७४५४१४,०५%
एकूण:२६७८२८८४१८२९६४५
  1. ^ a b "MAHARASHTRA STATE ASSEMBLY ELECTIONS 2004" (PDF). ६ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "Congress-NCP retains Maharashtra". १७ ऑक्टोबर २००४. ६ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन