पीक

(पिक या पानावरून पुनर्निर्देशित)

[१] धान्य, फळभाजी-पालेभाजी, मिरच्या-कोथिबीर, मोहरी, तैलबिया, डाळी, ऊस, किंवा तत्सम वार्षिक उत्पन्न असलेल्या व रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आणि शेतात पुरुषभर किंवा लहान उंचीच्या झुडुपावर उगवून कापणीयोग्य झालेल्या खाद्यपदार्थाला पीक म्हणतात. प्रत्येक पिकाचा एक हंगाम असतो. हंगामाच्या सुरुवातीस बियाणे पेरली जातात व हंगामाच्या शेवटी त्याचे पीक मिळते. पिके कापण्यासाठी विळी, कोयता किंवा कापणी यंत्र वापरतात. मनाजोगते व भरपूर पीक आल्यावर शेतकरी कुटुंब व व शेती समाज आनंदात असतो व तो आनंद एका शेती सणाने साजरा केला जातो. छोट्या शेतावर जिथे साधारणपणे यंत्रे नसतात तिथे पिकाची कापणी हा पीक हंगामातला सर्वात मेहनती काळ असतो. मोठ्या शेतांवर यंत्राने कापणी केली जाते. पीक काढणे ह्या प्रक्रियेत पिकाच्या कापणीनंतर ते बाजारात पाठवण्याअगोदर लगेच शेतावरच करायची कामेही येतात.

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण