दुराणी साम्राज्य

दुराणी साम्राज्य (पश्तो: د درانیانو واکمني ;) हे इ.स. १७४७ ते इ.स. १८४२ या कालखंडात अफगाणिस्तानात अस्तित्वात होते. इ.स. १७४७ साली अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली याने कंदाहारात त्याची स्थापना केली. इ.स. १७७३ साली अहमदशाहाचा मॄत्यूनंतर त्याच्या वंशजांकडे साम्राज्याचे अमीरपद चालू राहिले.

उदयोन्मुख लेख
हा लेख ३ जून, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता.२०१२चे इतर उदयोन्मुख लेख
दुराणी साम्राज्य
د درانیانو واکمني


इ.स. १७४७ - इ.स. १८४२
राजधानीकंदाहार (पूर्वकालीन)
काबूल (उत्तरकालीन)
राजेअमीर:
अहमदशाह अब्दाली (संस्थापक)
अयूबशाह दुराणी (अंतिम अमीर)
भाषापश्तो (अधिकृत)
दारी (प्रचलित भाषा)
क्षेत्रफळवर्ग किमी

परमोत्कर्षाच्या काळात दुराणी साम्राज्य पंजाबापासून इराणापर्यंतमध्य आशियातील अमू दर्या नदीखोऱ्यापासून अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. इ.स.च्या अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भरभराटीत असलेल्याओस्मानी साम्राज्याखालोखाल विस्तार पसरलेले हे दुसरे इस्लामी साम्राज्य होते.[१].

राज्यकर्ते

संपादन

दुराणी साम्राज्याचे राजे अमीर या किताबाने उल्लेखले जात. साम्राज्याचा संस्थापक अहमदशाह अब्दाली याच्यानंतर त्याचे वंशज गादीवर बसले. कालक्रमानुसार त्यांची सूची अशी:

नावकार्यकाळ
अहमदशाह अब्दालीइ.स. १७४७ - इ.स. १७७२
तिमूरशाह दुराणीइ.स. १७७२ - इ.स. १७९३
झमनशाह दुराणीइ.स. १७९३ - इ.स. १८०१
महमूदशाह दुराणीइ.स. १८०१ - इ.स. १८०३ (पहिल्यांदा)
इ.स. १८०९ - इ.स. १८१८ (दुसऱ्यांदा)
शुजाशाह दुराणीइ.स. १८०३ - इ.स. १८०९
अलीशाह दुराणीइ.स. १८१८ - इ.स. १८१९
अयूबशाह दुराणीइ.स. १८१९ - इ.स. १८२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "द दुरानी डायनॅस्टी". लुई डुप्री, नॅन्सी हॅच डुप्री (इंग्लिश भाषेत). २५ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन


🔥 Top keywords: