झिने एल अबिदिन बेन अली

झिने एल अबिदिन बेन अली (अरबी: زين العابدين بن علي‎; ३ सप्टेंबर १९३६) हा उत्तर आफ्रिकेमधील ट्युनिसिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. ट्युनिसियाचा पहिला अध्यक्ष हबीब बुरग्विबाला एका बंडादरम्यान सत्तेवरून हाकलून बेन अली १९८७ साली राष्ट्राध्यक्षपदावर आला.

झिने एल अबिदिन बेन अली

ट्युनिसियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
७ नोव्हेंबर १९८७ – १४ जानेवारी २०११
मागीलहबीब बुरग्विबा
पुढीलमुहमद घानूची

जन्म३ सप्टेंबर, १९३६ (1936-09-03) (वय: ८७)
हम्मम सुसा, फ्रेंच ट्युनिसिया
धर्मसुन्नी इस्लाम
बेन अली व जॉर्ज डब्ल्यू. बुश ह्यांची व्हाईट हाउसमधील भेट

आपल्या २४ वर्षांच्या कार्यकाळात बेन अलीने मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली. त्याच्या हुकुमशाही सत्तेला कंटाळून डिसेंबर २०१० मध्ये ट्युनिसियन जनतेने देशव्यापी आंदोलन सुरू केले. ह्या आंदोलनामध्ये बेन अलीला माघार घ्यावी लागली व त्याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो आपल्या कुटुंबासहित १४ जानेवारी २०११ रोजी सौदी अरेबिया देशामध्ये परागंदा झाला. त्याच्या अनुपस्थितीत ट्युनिसियामधील सर्वोच्च न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सध्या बेन अली जेद्दाह शहरामध्ये वास्तव्यास आहे.

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीबिरसा मुंडाप्रतापराव गणपतराव जाधवएकनाथ खडसेविशेष:शोधामुखपृष्ठरामदास आठवलेमहाराणा प्रतापशिवाजी महाराजनरेंद्र मोदीविचित्रवीर्यभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनचिराग पासवानमुंजा (भूत)पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघनिर्मला सीतारामनद्रौपदी मुर्मूदिशासंत तुकारामरोहिणी खडसे-खेवलकरपवन कल्याणभारताचे राष्ट्रपतीनितीन गडकरीप्रणिती शिंदेपीयूष गोयलनवग्रह स्तोत्रखासदारज्ञानेश्वरभारताचे संविधानअनुप्रिया पटेलमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगणपती स्तोत्रेराममोहन एन. किंजरापूमहाराष्ट्र विधानसभाएन. चंद्रबाबू नायडू