घन (भूमिती)

घन म्हणजे भरीव, घट्ट किंवा दृढ. जो पदार्थ पाण्याप्रमाणे किंवा हवेप्रमाणे प्रवाही नसतो त्या पदार्थाला घन पदार्थ म्हणतात. घन स्थितीत असणे हा त्या पदार्थाचा एक भौतिक गुणधर्म आहे. पदार्थाच्या घट्टपणाच्या मोजमापाला घनता म्हणतात.

२. घन हा एक भौमितिक आकार आहे. घनाला लांबी, रुंदीजाडी(किंवा उंची) असते (त्रिमिती असलेला आकार). घनाकृतीतील लांबी, रुंदी आणि उंची दाखवणाऱ्या रेषा एकमेकांना लंब असतात आणि त्यांचे माप समान असते. किंवा दुसऱ्या शब्दांत, सहा चौरसांनी सीमित केलेल्या आकृतीस घन म्हणतात.

. कोणत्याही संख्येला त्याच संख्येच्या वर्गाने गुणले म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो. किंवा तीन समान संख्यांचा गुणाकार हा त्या समान संख्येचा घन असतो.

४ गुणले ४ = १६.

४ गुणले १६ = ६४.

किंवा, ४ x ४ x ४ = ६४

म्हणजे, ६४ हा ४चा घन आहे.

आणि ४ हे चौसष्टचे घनमूळ आहे.

४. एखाद्या भरीव वस्तूने व्यापलेल्या जागेच्या मोजमापाला त्या वस्तूचे घनफळ म्हणतात.

. घन या शब्दाचे अन्य अर्थ :- मेघ, निबिड(अरण्य वगैरे), गंभीर(गर्जना वगैरे), दाट(प्रेम, साखरेचा पाक वगेरे), विस्तार(पूर्वक म्हणणे=घनपाठ)

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठपवन कल्याणविशेष:शोधाप्रणिती शिंदेदिशामुंजा (भूत)महाराष्ट्र विधानसभाचिराग पासवाननवग्रह स्तोत्रनिलेश लंकेभारताच्या पंतप्रधानांची यादीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरएन. चंद्रबाबू नायडूभारताचे संविधानशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजन सेना पक्षसंत तुकारामरायगड (किल्ला)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशरद पवारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रामधील जिल्हेमटकामहाराष्ट्रखासदारनरेंद्र मोदीमहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुषमा अंधारेजागतिक दिवसरक्षा खडसेवाय.एस. जगनमोहन रेड्डीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणा