आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली.[१] ह्या परिषदेमध्ये सुरुवातीला फक्त राष्ट्रकुलमधील देशांनाच सामिल होता येत होते.[२] ह्या सदस्यांनंतर १९२६ मध्ये भारत, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज, आणि त्यानंतर १९५३ मध्ये पाकिस्तान सामील झाला.[३] १९६१ मध्ये, राष्ट्रकुलामधून बाहेर पडल्याने दक्षिण आफ्रिकेने सदस्यत्वाचा राजीनामा दिला.[३] १९६५ मध्ये इंपेरियल क्रिकेट परिषदेचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे करण्यात आले त्याचबरोबर पहिल्यांदाच नियमन मंडळात राष्ट्रकुलाच्या बाहेरील देशांच्या निवडीला मंजूरी देण्याबाबत नवीन नियम केले गेले.[२] नियमन मंडळामध्ये नव्याने निवड झालेला कोणताही सदस्य फक्त सहयोगी (असोसिएट) सदस्य म्हणून निवड केला जातो ज्याला पूर्ण सदस्य होण्याची संधी असते. फिजी आणि अमेरिका हे सर्वात पहिले सहयोगी सदस्य होते.[२] १९८९ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नाव पुन्हा एकदा बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती असे केले गेले.[२] १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा पूर्ण सदस्य म्हणून निवडला गेला आणि १९९२ मध्ये झिम्बाब्वेची निवड.[३] सर्वात अलिकडील पूर्ण सदस्य अफगाणिस्तान आणि आयर्लंड, २०१७ साली नियुक्त केला गेला.[३] सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीमध्ये एकूण १०५ सदस्य आहेत.

सदस्यत्व दर्जानुसार सध्याचे आयसीसी सदस्य:
  पूर्ण सदस्य
  सहयोगी (असोसिएट) सदस्य
  संलग्न सदस्य
  सदस्य नाहीत
विकास विभागानुसार वर्तमान आयसीसी सदस्य:
  अमेरिका
  युरोप
  आफ्रिका
  आशिया
  पूर्व आशिया-पॅसिफिक

समितीच्या सदस्यत्वाचे तीन प्रकार आहेत: पूर्ण सदस्य, सहयोगी (असोसिएट) सदस्य, आणि संलग्न सदस्य.[२] सर्वात वरच्या श्रेणीमध्ये १० पूर्ण सदस्य आहेत. त्याखालोखाल ३९ सहयोगी सदस्य आणि सर्वात खालच्या श्रेणी मध्ये ५६ संलग्न सदस्य आहेत.

आयसीसी सदस्य संपादन

खालील यादीमध्ये, निलंबित सदस्य † ह्या खुणेने दर्शविले आहेत.

सदस्यत्वआफ्रिका (२२)अमेरिका (१७)आशिया (२१)पुर्व आशिया-पॅसिफिक (११)युरोप (३४)
संपूर्ण सदस्य (१०)  दक्षिण आफ्रिका
 झिम्बाब्वे
 वेस्ट इंडीज  बांगलादेश
 भारत
 पाकिस्तान
 श्रीलंका
 अफगाणिस्तान
 ऑस्ट्रेलिया
 न्यूझीलंड
 इंग्लंड
 आयर्लंड
सहयोगी सदस्य (३९)  बोत्स्वाना
 केन्या
 नामिबिया
 नायजेरिया
 टांझानिया
 युगांडा
 झांबिया
 आर्जेन्टिना
 बर्म्युडा
 कॅनडा
 केमन द्वीपसमूह
 सुरिनाम
 अमेरिका
 हाँग काँग
 कुवेत
 मलेशिया
 नेपाळ
 ओमान
 कतार
 सौदी अरेबिया
 सिंगापूर
 थायलंड
 संयुक्त अरब अमिराती
 फिजी
 जपान
 पापुआ न्यू गिनी
 व्हानुआतू
 बेल्जियम
 डेन्मार्क
 फ्रान्स
 जर्मनी
 जिब्राल्टर
 गर्न्सी
 इस्रायल
 इटली
 जर्सी
 नेदरलँड्स
 स्कॉटलंड
संलग्न सदस्य (५६)  कामेरून
 गांबिया
 घाना
 लेसोथो
 मलावी
 माली
 मोरोक्को
 मोझांबिक
 रवांडा
 सेशेल्स
 सियेरा लिओन
 सेंट हेलेना
 इस्वाटिनी
 बहामास
 बेलीझ
 ब्राझील
 चिली
 कोस्टा रिका
 फॉकलंड द्वीपसमूह
 मेक्सिको
 पनामा
 पेरू
 टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
 बहरैन
 भूतान
 चीन
 इराण
 मालदीव
 म्यानमार
 कूक द्वीपसमूह
 इंडोनेशिया
 फिलिपिन्स
 सामो‌आ
 दक्षिण कोरिया
 ऑस्ट्रिया
 बल्गेरिया
 क्रोएशिया
 सायप्रस
 चेक प्रजासत्ताक
 एस्टोनिया
 फिनलंड
 ग्रीस
 हंगेरी
 आईल ऑफ मान
 लक्झेंबर्ग
 माल्टा
 नॉर्वे
 पोर्तुगाल
 रोमेनिया
 रशिया
 सर्बिया
 स्लोव्हेनिया
 स्पेन
 स्वीडन
 तुर्कस्तान

पूर्ण सदस्य संपादन

पूर्ण सदस्य हे देशातील किंवा सहयोगी देशातील क्रिकेट नियामक मंडळ असते. पूर्ण सदस्य हे एका भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधी असू शकतात. सर्व पूर्ण सदस्यांना अधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी एक संघ पाठवण्याची मुभा असते. त्याशिवाय, पूर्ण सदस्य असलेल्या देश हे आपोआपच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यास पात्र असतात.[२] वेस्ट इंडीज संघ कोणत्याही एका देशाचे प्रतिनिधीत्व करत नाही तर कॅरिबियन प्रदेशातील एकूण २० देश आणि प्रदेशांचा एकत्रित संघ आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट संघ हा इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो. सदस्य देशांची अधिकृत क्रमवारी दर्शवणारे संकेतस्थळ येथे Archived 2016-03-04 at the Wayback Machine. आहे.

क्रदेशसंघप्रशासकीय संघटनाह्या तारखेपासून सदस्य [२]सध्याची क्रमवारी
कसोटीएकदिवसीयटी२०
 इंग्लंडपुरुषमहिला१९वइंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ१५ जुलै १९०९
 ऑस्ट्रेलियापुरुषमहिला१९वक्रिकेट ऑस्ट्रेलिया१५ जुलै १९०९
 झिम्बाब्वेपुरुषमहिला१९वझिम्बाब्वे क्रिकेट६ जुलै १९९२१०१११२
 दक्षिण आफ्रिकापुरुषमहिला१९वक्रिकेट दक्षिण आफ्रिका१५ जुलै १९०९
 न्यूझीलंडपुरुषमहिला१९वन्यू झीलंड क्रिकेट३१ मे १९२६
 पाकिस्तानपुरुषमहिला१९वपाकिस्तान क्रिकेट मंडळ२८ जुलै १९५२
 बांगलादेशपुरुषमहिला१९वबांगलादेश क्रिकेट मंडळ२६ जून २०००१०
 भारतपुरुषमहिला१९वभारतीय क्रिकेट नियामक मंडळ३१ मे १९२६
 वेस्ट इंडीजपुरुषमहिला१९ववेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ३१ मे १९२६
१०  श्रीलंकापुरुषमहिला१९वश्रीलंका क्रिकेट२१ जुलै १९८१

सहयोगी सदस्य संपादन

सहयोगी सदस्य देशांमध्ये त्या देशांचा समावेश होतो जे पूर्ण सदस्यत्व पात्र नाहीत परंतु जेथे क्रिकेटची घट्टपणे स्थापना झाली आहे आणि क्रिकेट संघटित आहे.[२] सहयोगी सदस्यांमध्ये एकूण ३९ देशांचा सहभाग असून, सर्वात अलिकडे सौदी अरेबियाचा समावेश झाला आहे.

सर्व सहयोगी सदस्य आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा आणि आयसीसीद्वारा प्रशासित एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी पात्र असतात.[४] दर दोन वर्षांनी होणाऱ्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० (२०१८ पर्यंत, पुढील टी२० विश्वचषक २०१८ मध्ये होईल) साठीची पात्रता प्रक्रिया म्हणून आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता स्पर्धा घेतली जाते. पात्र संघाला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० चा दर्जा दिला जातो.[५]

राष्ट्रीय प्रशासकीय संघटनेच्या इतर प्रशासकीय गरजांसोबत सहयोगी सदस्यांनी खालील निकषांचे पालन करणे गरजेचे असते:[६]

  • व्यवस्थित बांधणीच्या स्पर्धांमध्ये खेळणारे किमान १६ वरिष्ठ आणि १६ कनिष्ठ संघ असावेत;
  • किमान ८ क्रिकेट मैदाने वापरण्याची परवानगी असावी, ज्यामधील किमान ४ मैदानांवर स्थायी स्वरूपातील खेळपट्टी असावी.

खालील यादीमध्ये, निलंबित सदस्य † ह्या खुणेने दर्शविले आहेत.

क्र.देशसंघप्रशासकीय संघटनावर्षसंदर्भ
 अमेरिकापुरुषमहिला१९वअमेरिका क्रिकेट संघटना१९६५[७]
 अफगाणिस्तानपुरुषमहिला१९वअफगाणिस्तान क्रिकेट मंडळ२०१३[८]
 आयर्लंडपुरुषमहिला१९वक्रिकेट आयर्लंड१९९३[२]
 आर्जेन्टिनापुरुषमहिला१९वआर्जेंटिना क्रिकेट संघटना१९७४[९]
 इटलीपुरुषमहिला१९वक्रिकेट इटालीयन फेडरेशन१९९५[१०]
 इस्रायलपुरुषमहिला१९वइस्रायल क्रिकेट संघटना१९७४[२]
 ओमानपुरुषमहिला१९वओमान क्रिकेट मंडळ२०१४[११]
 कुवेतपुरुषमहिला१९वकुवेत क्रिकेट संघटना१९९८[१२]
 कॅनडापुरुषमहिला१९वक्रिकेट कॅनडा१९६८[२]
१०  केन्यापुरुषमहिला१९वक्रिकेट केन्या१९८१[२]
११  केमन द्वीपसमूहपुरुषमहिला१९वकेमन द्वीपसमूह क्रिकेट संघटना१९९७[१३]
१२  गर्न्सीपुरुषमहिला१९वगर्न्सी क्रिकेट मंडळ२००८[१४]
१३  जपानपुरुषमहिला१९वजपान क्रिकेट संघटना१९८९[१५]
१४  जर्मनीपुरुषमहिला१९वजर्मन क्रिकेट फेडरेशन१९९९[१६]
१५  जर्सीपुरुषमहिला१९वजर्सी क्रिकेट मंडळ२००७[१७]
१६  जिब्राल्टरपुरुषमहिला१९वजिब्राल्टर क्रिकेट संघटना१९६९[१८]
१७  झांबियापुरुषमहिला१९वझांबिया क्रिकेट युनियन२००३[१९]
१८  टांझानियापुरुषमहिला१९वटांझानिया क्रिकेट संघटना२००१[२०]
१९  डेन्मार्कपुरुषमहिला१९वडॅनिश क्रिकेट फेडरेशन१९६६[२१]
२०  थायलंडपुरुषमहिला१९वथायलंड क्रिकेट लीग१९९५[२२]
२१  नामिबियापुरुषमहिला१९वनामिबिया क्रिकेट मंडळ१९९२[२३]
२२  नायजेरियापुरुषमहिला१९वनायजेरिया क्रिकेट संघटना२००२[२४]
२३  नेदरलँड्सपुरुषमहिला१९वरॉयल डच क्रिकेट मंडळ१९६६[२]
२४  नेपाळपुरुषमहिला१९वनेपाळ क्रिकेट संघटना१९९६[२५]
२५  पापुआ न्यू गिनीपुरुषमहिला१९वपापुआ न्यू गिनी क्रिकेट मंडळ१९७३[२६]
२६  फिजीपुरुषमहिला१९वफिजी क्रिकेट संघटना१९६५[२७]
२७  फ्रान्सपुरुषमहिला१९वफ्रान्स क्रिकेट संघटना१९९८[२८]
२८  बर्म्युडापुरुषमहिला१९वबर्म्युडा क्रिकेट मंडळ१९६६[२]
२९  बेल्जियमपुरुषमहिला१९वबेल्जियम क्रिकेट फेडरेशन१९९१[२९]
३०  बोत्स्वानापुरुषमहिला१९वबोत्स्वाना क्रिकेट संघटना२००१[३०]
३१  मलेशियापुरुषमहिला१९वमलेशिया क्रिकेट संघटना१९६७[३१]
३२  युगांडापुरुषमहिला१९वयुगांडा क्रिकेट संघटना१९९८[३२]
३३  व्हानुआतूपुरुषमहिला१९वव्हानुआतू क्रिकेट संघटना२००९[३३]
३४  संयुक्त अरब अमिरातीपुरुषमहिला१९वसंयुक्त अरब अमिराती क्रिकेट मंडळ१९९०[३४]
३५  सिंगापूरपुरुषमहिला१९वसिंगापूर क्रिकेट संघटना१९७४[३५]
३६  सुरिनामपुरुषमहिला१९वसुरिनाम क्रिकेट मंडळ२००२[३६]
३७  सौदी अरेबियापुरुषमहिला१९वसौदी क्रिकेट केंद्र२०१६[३७]
३८  स्कॉटलंडपुरुषमहिला१९वक्रिकेट स्कॉटलंड१९९४[२]
३९  हाँग काँगपुरुषमहिला१९वहाँग काँग क्रिकेट संघटना१९६९[२]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा असलेले सहयोगी सदस्य संपादन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीतर्फे विश्व क्रिकेट लीगच्या यशावरून सहयोगी आणि संलग्न सदस्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा दिला जातो. सर्वोत्तम सहा संघांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा दिला जातो, त्यामुळे अशा सहयोगी आणि संलग्न सदस्यांना पूर्ण सदस्यांसोबत अधिकृत एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास परवानगी मिळते.

एकदिवसीय दर्जा असलेले सहयोगी सदस्य खालीलप्रमाणे:

क्र.संघप्रशासकीय संघटनापासून सदस्यसध्याची ए.दि. क्रमवारी
 अमेरिकाअमेरिका क्रिकेट मंडळ२०१३[८]१०
 ओमानक्रिकेट ओमान१९९३[२]१२
 पापुआ न्यू गिनीपापुआ न्यु गिनी क्रिकेट मंडळ१९७३[२]१६
 संयुक्त अरब अमिरातीअमिराती क्रिकेट मंडळ१९९०[२]१४
 स्कॉटलंडक्रिकेट स्कॉटलंड१९९४[२]१३
 नामिबियानामिबिया क्रिकेट संघटना१९६९[२]१५
 नेदरलँड्सक्रिकेट नेदरलँड्स१९६९[२]१५
 नेपाळनेपाळ क्रिकेट१९६९[२]१५

आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असलेले सहयोगी सदस्य संपादन

अफगाणिस्तान, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, संयुक्त अरब अमिराती, स्कॉटलंड आणि हाँग काँग ह्या संघांकडे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा असल्याने आपोआपच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा सुद्धा मिळाला आहे. आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६ साठी पात्र ठरलेल्या नेदरलँड्स संघाचा टी२० दर्जा कायम राहिला तर या स्पर्धेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या ओमानला सुद्धा आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा प्रदान करण्यात आला.

सध्या आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असलेले सहयोगी सदस्य खालीलप्रमाणे:

क्र.संघप्रशासकीय संघटनापासून सदस्यसध्याची टी२०आं क्रमवारी
 अफगाणिस्तानअफगाणिस्तान क्रिकेट मंडळ२०१३[८]
 आयर्लंडक्रिकेट आयर्लंड१९९३[२]१५
 ओमानओमान क्रिकेट मंडळ२०१५[३८]१६
 नेदरलँड्सकॉनिंक्लिज्के नेदरलँड्से क्रिकेट बॉंड१९९६[२]११
 पापुआ न्यू गिनीपापुआ न्यु गिनी क्रिकेट मंडळ१९७३[२]क्रमवारीसाठी पुरेसे सामने खेळले नाहीत.
 संयुक्त अरब अमिरातीअमिरात क्रिकेट मंडळ१९९०[२]१४
 स्कॉटलंडक्रिकेट स्कॉटलंड१९९४[२]१३
 हाँग काँगहाँग काँग क्रिकेट संघटना१९६९[२]१७

संलग्न सदस्य संपादन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या मान्यतेनुसार ज्या देशांमध्ये नियमांना अनुसरून क्रिकेट खेळले जाते ते देश संलग्न सदस्य म्हणून ओळखले जातात.[२] सध्या एकून ५६ संलग्न सदस्य आहेत. राष्ट्रीय प्रशासकीय संघटनेच्या इतर प्रशासकीय गरजांसोबत संलग्न सदस्यांनी खालील निकषांचे पालन करणे गरजेचे असते:[३९]

  • व्यवस्थित बांधणीच्या स्पर्धांमध्ये खेळणारे किमान ८ वरिष्ठ आणि ४ कनिष्ठ संघ असावेत
  • किमान २ क्रिकेट मैदाने वापरण्याची परवानगी असावी
  • आयसीसी वगळता इतर स्त्रोतांपासून दरवर्षी $२,५०० पेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे

संलग्न सदस्यांचा विचार सहयोगी सदस्यत्त्वासाठी होण्याकरता राष्ट्रीय प्रशासकीय संघटनेने सहयोगी सदस्यत्त्वासाठी गरजेचे निकष पूर्ण केल्याचे सिद्ध करावे लागते आणि त्याशिवाय शेवटच्या तीन वर्षांत खेळाविषयीचे खालील मानदंड अनुसरलेले असले पाहिजेत:[६]

  • शेवटच्या तीन वर्षांत सर्व संबंधित जागतिक किंवा प्रादेशिक आयसीसी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणे
  • प्रदेशामधील संलग्न सभासदांपैकी १ला, ३रा किंवा ३रा क्रमांक मिळवणे आणि
  • खालीलपैकी एक साध्य करणे:
    • ५० षटकांच्या किमान २ सामन्यांमध्ये सहयोगी देशांचा पराभव
    • ५० षटकांच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान दोनवेळा खूप स्पर्धात्मक खेळ
    • ५० षटकांच्या सामन्यांमध्ये एका सहयोगी सदस्याचा पराभव आणि सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान एकदा खूप स्पर्धात्मक खेळ
    • २० षटकांच्या सामन्यामध्ये कोणत्याही सहयोगी देशाविरुद्ध ३ विजयी
    • २० षटकांच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान तीनवेळा खूप स्पर्धात्मक खेळ
    • २० षटकांच्या सामन्यांमध्ये सहयोगी सदस्याचा दोन वेळा पराभव आणि सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान एकदा खूप स्पर्धात्मक खेळ
    • २० षटकांच्या सामन्यांमध्ये सहयोगी सदस्याचा एक वेळा पराभव आणि सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान दोनवेळा खूप स्पर्धात्मक खेळ
    • आयसीसीच्या जागतिक किंवा प्रादेशिक स्पर्धेमध्ये असे ३ निकाल ज्यामध्ये सहयोगी सदस्याविरुद्ध विजय आणि/किंवा ५० आणि/किंवा २० षटकांच्या सामन्यामध्ये सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान एकदा खूप स्पर्धात्मक खेळ

खालील यादीमध्ये, निलंबित सदस्य † ह्या खुणेने दर्शविले आहेत.

क्र.देशसंघप्रशासकीय संघटनावर्षसंदर्भ
 आईल ऑफ मानपुरुषमहिला१९वआईल ऑफ मान क्रिकेट संघटना२००४[४०]
 इंडोनेशियापुरुषमहिला१९वइंडोनेशिया क्रिकेट फाउंडेशन२००१[४१]
 इराणपुरुषमहिला१९वइस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण क्रिकेट संघटना२००३[४२]
 एस्टोनियापुरुषमहिला१९वएस्टोनिया क्रिकेट संघटना२००८[४३]
 ऑस्ट्रियापुरुषमहिला१९वऑस्ट्रिया क्रिकेट संघटना१९९२[४४]
 कतारपुरुषमहिला१९वकतार क्रिकेट संघटना१९९९[४५]
 कामेरूनपुरुषमहिला१९वकामेरून क्रिकेट संघटना२००७[४६]
 कूक द्वीपसमूहपुरुषमहिला१९वकूक द्वीपसमूह क्रिकेट संघटना२०००[४७]
 कोस्टा रिकापुरुषमहिला१९वकोस्टा रिका क्रिकेट फेडरेशन२००२[४८]
१०  क्रोएशियापुरुषमहिला१९वक्रोएशिया क्रिकेट मंडळ२००१[४९]
११  गांबियापुरुषमहिला१९वगांबिया क्रिकेट संघटना२००२[५०]
१२  ग्रीसपुरुषमहिला१९वहेल्लेनिक क्रिकेट फेडरेशन१९९५[५१]
१३  घानापुरुषमहिला१९वघाना क्रिकेट संघटना२००२[५२]
१४  चिलीपुरुषमहिला१९वचिली क्रिकेट संघटना२००२[५३]
१५  चीनपुरुषमहिला१९वचीनी क्रिकेट संघटना२००४[५४]
१६  चेक प्रजासत्ताकपुरुषमहिला१९वचेक प्रजासत्ताक क्रिकेट युनियन२०००[५५]
१७  टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहपुरुषमहिला१९वटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह क्रिकेट संघटना२००२[५६]
१८  तुर्कस्तानपुरुषमहिला१९वतुर्किश क्रिकेट मंडळ२००८[५७]
१९  दक्षिण कोरियापुरुषमहिला१९वकोरिया क्रिकेट संघटना२००१[५८]
२०  नॉर्वेपुरुषमहिला१९वनॉर्वे क्रिकेट मंडळ२०००[५९]
२१  पनामापुरुषमहिला१९वपनामा क्रिकेट संघटना२००२[६०]
२२  पेरूपुरुषमहिला१९वपेरू क्रिकेट संघटना२००७[२]
२३  पोर्तुगालपुरुषमहिला१९वपोर्तुगिज क्रिकेट फेडरेशन१९९६[६१]
२४  फिनलंडपुरुषमहिला१९वफिनीश क्रिकेट संघटना२०००[६२]
२५  फिलिपिन्सपुरुषमहिला१९वफिलिपाईन्स क्रिकेट संघटना२०००[६३]
२६  फॉकलंड द्वीपसमूहपुरुषमहिला१९वफॉकलंड क्रिकेट संघटना२००७[६४]
२७  बल्गेरियापुरुषमहिला१९वबल्गेरिया क्रिकेट फेडरेशन२००८[६५]
२८  बहरैनपुरुषमहिला१९वबहरैन क्रिकेट संघटना२००१[६६]
२९  बहामासपुरुषमहिला१९वबहामास क्रिकेट संघटना१९८७[६७]
३०  बेलीझपुरुषमहिला१९वबेलीझ राष्ट्रीय क्रिकेट संघटना१९९७[६८]
३१  ब्राझीलपुरुषमहिला१९वब्राझील क्रिकेट संघटना२००२[६९]
३२  भूतानपुरुषमहिला१९वभूतान क्रिकेट समिती मंडळ२००१[७०]
३३  मलावीपुरुषमहिला१९वमलावी क्रिकेट संघटना२००३[७१]
३४  मालदीवपुरुषमहिला१९वमालदीव क्रिकेट नियामक मंडळ१९९८[७२]
३५  मालीपुरुषमहिला१९वमाली क्रिकेट फेडरेशन२००५[२]
३६  माल्टापुरुषमहिला१९वमाल्टा क्रिकेट संघटना१९९८[७३]
३७  मेक्सिकोपुरुषमहिला१९वमेक्सिको क्रिकेट संघटना२००४[७४]
३८  मोझांबिकपुरुषमहिला१९वमोझांबिक क्रिकेट संघटना२००३[७५]
३९  मोरोक्कोपुरुषमहिला१९वरॉयल मोरक्कन क्रिकेट फेडरेशन१९९९[५७]
४०  म्यानमारपुरुषमहिला१९वम्यानमार क्रिकेट फेडरेशन२००६[७६]
४१  रवांडापुरुषमहिला१९वरवांडा क्रिकेट संघटना२००३[७७]
४२  रशियापुरुषमहिला१९वक्रिकेट रशिया२०१२[७८]
४३  रोमेनियापुरुषमहिला१९वक्रिकेट रोमेनिया२०१३[७९]
४४  लक्झेंबर्गपुरुषमहिला१९वलक्झेंबर्ग क्रिकेट फेडरेशन१९९८[८०]
४५  लेसोथोपुरुषमहिला१९वलेसोथो क्रिकेट संघटना२००१[८१]
४६  सर्बियापुरुषमहिला१९वसर्बिया क्रिकेट फेडरेशन२०१५[५७]
४७  सामो‌आपुरुषमहिला१९वक्रिकेट सामोआ२०००[८२]
४८  सायप्रसपुरुषमहिला१९वसायप्रस क्रिकेट संघटना१९९९[८३]
४९  सियेरा लिओनपुरुषमहिला१९वसियेरा लिओन क्रिकेट संघटना२००२[८४]
५०  सेंट हेलेनापुरुषमहिला१९वसेंट हेलेना क्रिकेट संघटना२००१[८५]
५१  सेशेल्सपुरुषमहिला१९वसेशेल्स क्रिकेट संघटना२०१०[८६]
५२  स्पेनपुरुषमहिला१९वCricket Spain१९९२[८७]
५३  स्लोव्हेनियापुरुषमहिला१९वस्लोव्हेनिया क्रिकेट संघटना२००५[८८]
५४  इस्वाटिनीपुरुषमहिला१९वस्वाझीलँड क्रिकेट संघटना२००७[८९]
५५  स्वीडनपुरुषमहिला१९वस्वीडन क्रिकेट फेडरेशन१९९७[९०]
५६  हंगेरीपुरुषमहिला१९वहंगेरी क्रिकेट संघटना२०१२[९१]

माजी सदस्य संपादन

क्रदेशसंघप्रशासकीय संघटनासदस्यत्व
कालावधी
नोंदी
 ब्रुनेईपुरुषमहिला१९वब्रुनेई दारुस्सालम क्रिकेट संघटना१९९२-२०१५सदस्यत्व २०१४ मध्ये निलंबित, २०१५ मध्ये पूर्णपणे काढून टाकले.[५७]
 क्युबापुरुषमहिला१९वक्युबन क्रिकेट कमिशन२००२-२०१३आयसीसीच्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार "व्यवहार करण्यासाठी योग्य प्रशासकीय रचना न दाखवल्यामुळे" २०१३ मध्ये सदस्यत्त्व रद्द.[९२]
 स्वित्झर्लंडपुरुषमहिला१९वस्विस क्रिकेट संघटना१९८५-२०१२सदस्यत्व २०११ मध्ये निलंबित, २०१२ मध्ये पूर्णपणे काढून टाकले.[९३]
 टोंगापुरुषमहिला१९वटोंगा क्रिकेट संघटना२०००-२०१४सदस्यत्व २०१३ मध्ये निलंबित, २०१४ मध्ये पूर्णपणे काढून टाकले.[९४][९५][९६]
पूर्व आफ्रिकापुरुषमहिला१९वपूर्व आफ्रिका क्रिकेट कॉन्फरन्स (१९६६-१९८९),
पूर्व आणि मध्य आफ्रिका क्रिकेट कॉन्फरन्स(१९८९-२००३)
१९६६-२००३केन्या (सहयोगी, १९८१), युगांडा (सहयोगी, १९९८), टांझानिया (सहयोगी, २००१),
झांबिया (सहयोगी, २००३), आणि मलावी (संलग्न, २००३) हे संघ स्थापन.
पश्चिम आफ्रिकापुरुषमहिला१९वपश्चिम आफ्रिका क्रिकेट संघ१९७६-२००३नायजेरिया (सहयोगी २००३), गांबिया, घाना, आणि सियेरा लिओन (सर्व संलग्न, २००३) हे संघ स्थापन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा इतिहास" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-12-25. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af "थोडक्यात इतिहास ..." (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "विश्व क्रिकेट लीग चॅंपियनशीप" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-11-20. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "केन्याच्या वॉर्म-अप दर्जाविषयी आयसीसीची भूमिका स्पष्ट" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ a b "आयसीसी सहयोगी सदस्यत्व निकष व मार्गदर्शक तत्त्वे" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2012-11-01. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ (२६ जून २०१५). "लक्षणीय चिंताजनक बाबींमुळे आयसीसीकडून अमेरिका निलंबीत" – इएसपीएन क्रिकइन्फो. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ a b c "अफगाणिस्तानला सहयोगी सदस्याचा दर्जा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "क्रिकइन्फो - आर्जेंटिना" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-इटली" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "मेलबर्नमधील आयसीसी मंडळाच्या सभेचा निकाल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2014-07-12. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-कुवेत" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-केमन द्वीपसमूह" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-गर्न्सी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-जपान" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-जर्मनी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-जर्सी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-जिब्राल्टर" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  19. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-झांबिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  20. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-टांझानिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-डेन्मार्क" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-थायलंड" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-नामिबिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ- नायजेरिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ पीटर डेल्ला पेनन. "आयसीसीकडून नेपाळ क्रिकेट असोसिएशन निलंबीत". इएसपीएन क्रिकइन्फो. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  26. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-पापुआ न्यू गिनी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  27. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फिजी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  28. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फ्रान्स" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  29. ^ "क्रिकइन्फो - बेल्जियम" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ "क्रिकइन्फो - बोत्स्वाना" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मलेशिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-युगांडा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-व्हानुआतू" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  34. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-संयुक्त अरब अमिराती" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  35. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सिंगापूर" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  36. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सुरिनाम" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  37. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सौदी अरेबिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  38. ^ "संस्मरणीय विजयासह ओमानचे विश्व टी२० स्थान सुरक्षित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  39. ^ "आयसीसी संलग्न सदस्यत्व निकष व मार्गदर्शक तत्त्वे" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2015-11-03. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  40. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-आईल ऑफ मान" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  41. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-इंडोनेशिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  42. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-इराण" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  43. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-एस्टोनिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  44. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-ऑस्ट्रिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  45. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-कतार" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  46. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-Cameroon" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  47. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-कूक द्वीपसमूह" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  48. ^ अमेरिकाज न्यूझ फ्लॅश जुलै २००९ Archived 2011-07-24 at the Wayback Machine. icc-cricket.yahoo.net
  49. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-क्रोएशिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  50. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-गांबिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  51. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-ग्रीस" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  52. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-घाना" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  53. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-चिली" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  54. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-चीन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  55. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-चेक प्रजासत्ताक" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  56. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  57. ^ a b c d "आयसीसीचे नवे अध्यक्ष झहीर अब्बास" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  58. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-दक्षिण कोरिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  59. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-नॉर्वे" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  60. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-पनामा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  61. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-पोर्तुगाल" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  62. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फिनलंड" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  63. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फिलिपाईन्स" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  64. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फॉकलंड द्वीपसमूह" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  65. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-बल्गेरिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  66. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-बहरैन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  67. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-बहामास" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  68. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-बेलीझ" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  69. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-ब्राझील" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  70. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-भूतान" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  71. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मलावी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  72. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मालदीव" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  73. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-माल्टा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  74. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मेक्सिको" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  75. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मोझांबिक" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  76. ^ "आयसीसी संलग्न सदस्य - म्यानमार" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-09-19. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  77. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-रवांडा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  78. ^ "आयसीसी कॉन्फरन्स २०१२ घोषणा". Archived from the original on 2012-06-29. 2016-11-30 रोजी पाहिले.
  79. ^ "लंडनमधील आयसीसी वार्षिक कॉन्फरन्स वीकचे परिणाम" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2013-09-21. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  80. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-लक्झेंबर्ग" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  81. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-लेसोथो" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  82. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सामोआ" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  83. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सायप्रस" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  84. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सियेरा लिओन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  85. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सेंट हेलेना" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  86. ^ "आयसीसी-बातम्या-आयसीसी वार्षिक सभा सिंगापुरचे परिणाम" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-09-24. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  87. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-स्पेन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  88. ^ "आयसीसीमध्ये चार नवीन सदस्य" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  89. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-स्वाझीलँड" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  90. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-स्वीडन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  91. ^ "आयसीसी परिषद २०१२ घोषणा". Archived from the original on 2012-06-29. 2016-11-30 रोजी पाहिले.
  92. ^ सदस्य आढावा Archived 2013-08-16 at the Wayback Machine. – आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  93. ^ चैतन्य (२९ जून २०१२). "आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून २०१४ पासून उच्च स्तरीय बदलांना मान्यता" Archived 2015-04-04 at the Wayback Machine. – iCricket Buzz. १ डिसेंबर २०१६.
  94. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-टोंगा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  95. ^ पीटर डेल्ला पन्ना (१८ जून २०१४). "अमेरिका आणि नेपाळला आयसीसी ताकीद देणार " – इएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  96. ^ (२८ जून २०१४). "नेपाळ, नेदरलँड्सला आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा " – इएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या