अल्लू अर्जुन

भारतीय चित्रपट अभिनेता

अल्लू अर्जुन (तेलुगू: అల్లు అర్జున్; ८ एप्रिल १९८२) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे जो प्रामुख्याने तेलगू चित्रपटांत काम करतो. विजेता चित्रपटात बाल कलाकार म्हणून आणि डॅडीत नर्तक म्हणून काम केल्यावर अर्जुनने गंगोत्री चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

अल्लू अर्जुन
जन्म८ एप्रिल, १९८३ (1983-04-08) (वय: ४१)
चेन्नई, तमिळनाडू ,भारत.
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रचित्रपट
कारकीर्दीचा काळसन २००१ पासून-आजतागायत
भाषातेलुगु
प्रमुख चित्रपटआर्या
वडीलअल्लू अरविंद
आईअल्लू निर्मला
पत्नी
स्नेहा रेड्डी (ल. २०११)
अपत्ये

त्यानंतर अर्जुन सुकुमारच्या आर्या चित्रपटात दिसला.आर्या मधील त्याची भूमिका ही त्याच्या यशाची पायरी होती, त्याने त्याला फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेता पुरस्काराने नामांकन मिळवून दिला आणि नंदी पुरस्कार सोहळ्यात त्याला विशेष ज्युरी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेता जूरीसाठी दोन सिनेमा (CineMAA) पुरस्कार मिळाले आणि ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले.

त्यानंतर त्याने व्ही. व्ही. विनायकच्या बनीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी बन्नीची भूमिका साकारली. समीक्षकांनी त्याच्या पद्धती आणि नृत्याचे कौतुक केले. त्याचा पुढचा चित्रपट ए. करुणाकरनची संगीतमय प्रेमकथा हॅपी होता. त्यानंतर त्यांनी पुरी जगन्नाथच्या देसमदुरु' या ऍक्शन फिल्ममध्ये काम केले, ज्यात त्यांनी बाला गोविंदम या निर्भय पत्रकाराची भूमिका केली होती.

अर्जुनने पाच दाक्षिणात्य फिल्मफेर अवॉर्ड्स व दोन नंदी पुरस्कार जिंकले आहेत.

वैयक्तिक जीवन संपादन

अल्लू अर्जुनचा जन्म चेन्नई, तमिळनाडु येथे चित्रपट निर्माता अल्लू अरविंद व निर्मला ह्यांच्या घरी झाला. अल्लू रामलिंगय्या हे प्रसिद्ध चित्रपट विनोदवीर त्याचे आजोबा लागतात. त्याच्या आत्याचे लग्न चिरंजीवीसोबत झाले आहे.

दि. ६ मार्च २०११ रोजी हैदराबाद येथे अल्लू अर्जुनचे लग्न स्नेहा रेड्डीसोबत झाले. त्यांना अयान नावाचा मुलगा व अर्हा नावाची मुलगी आहे. सन २०१६ मध्ये अल्लू अर्जुनने एम किचन आणि बफॅलो वाईल्ड विंग्स सोबत ८०० ज्युबली नावाचे नाईटक्लब चालू केले.

कारकीर्द संपादन

सुरुवात (२००१-२००८) संपादन

विजेतामध्ये बालकलाकाराची व डॅडीमध्ये नर्तकाची भूमिका केल्यावर गंगोत्री चित्रपटातून अर्जुनने प्रौढपणे चित्रपटांत पदार्पण केले.

त्यानंतर अर्जुन सुकुमारच्या कॉमेडी चित्रपट आर्यात दिसला. आर्या मधील भुमिकेमुळे त्यांना पहिल्यांदा फिल्मफेर सर्वोत्कृष्ट तेलुगु अभिनेतासाठी नामांकन आणि नंदी पुरस्कार सोहळ्यात त्याला विशेष ज्युरी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेता जूरीसाठी दोन सिनेमा (CineMAA) पुरस्कार मिळाले आणि ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले.

त्यानंतर त्याने व्ही. व्ही. विनायकच्या बनीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी बन्नीची भूमिका साकारली. समीक्षकांनी त्याच्या पद्धती आणि नृत्याचे कौतुक केले. त्याचा पुढचा चित्रपट ए. करुणाकरनची संगीतमय प्रेमकथा हॅपी होता. त्यानंतर त्यांनी पुरी जगन्नाथच्या देसमदुरु या ऍक्शन फिल्ममध्ये काम केले, ज्यात त्यांनी बाला गोविंदम या निर्भय पत्रकाराची भूमिका केली होती.

चित्रपट यादी संपादन

Key

| Denotes films that have not yet been released

वर्षशीर्षकभूमिकाटिप
१९८५विजेतालहान नायकबालकलाकार
१९८६स्वातीमुत्यमसिवय्याचा नातूबालकलाकार
२००१डॅडीगोपीविशेष दर्शन
२००३गंगोत्रीसिम्हाद्रीपदार्पण चित्रपट
२००४आर्याआर्या
२००५बन्नीबन्नी/राजा
२००६हैप्पीबन्नी
२००७देशमुदुरूबाला गोविंद
२००७शंकर दादा जिंदाबादस्वतःविशेष दर्शन
२००८परुगुकृष्णा
२००९आर्या २आर्या
२०१०वरुडूसंदीप/रिशी
२०१०वेदमआनंद राजू /केबल राजू
२०११बद्रीनाथबद्री
२०१२जुलाईरवींद्र (रवी) नारायण
२०१३इद्दरम्मायिलतोसंजय (संजू) रेड्डी
२०१४येवडूसत्याविशेष दर्शन
२०१४रेस गुर्रमलक्ष्मण/लकी
२०१४I Am That Changeस्वतःशोर्ट फिल्म, निर्माता देखील
२०१५सन ऑफ सत्यमुर्तीविराज आनंद
२०१५रुद्रमादेवीगोना गन्ना रेड्डी
२०१६सरैनोडूगणा
२०१७दुव्वडा जगन्नाथम्दुव्वडा जगन्नाथम् (डीजे)
२०१८ना पेरु सुर्यासुर्या
२०२०आल वैकुंठपुरमुलो देवराजचित्रीकरण चालू आहे.
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीबिरसा मुंडाप्रतापराव गणपतराव जाधवएकनाथ खडसेविशेष:शोधामुखपृष्ठरामदास आठवलेमहाराणा प्रतापशिवाजी महाराजनरेंद्र मोदीविचित्रवीर्यभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनचिराग पासवानमुंजा (भूत)पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघनिर्मला सीतारामनद्रौपदी मुर्मूदिशासंत तुकारामरोहिणी खडसे-खेवलकरपवन कल्याणभारताचे राष्ट्रपतीनितीन गडकरीप्रणिती शिंदेपीयूष गोयलनवग्रह स्तोत्रखासदारज्ञानेश्वरभारताचे संविधानअनुप्रिया पटेलमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगणपती स्तोत्रेराममोहन एन. किंजरापूमहाराष्ट्र विधानसभाएन. चंद्रबाबू नायडू