शिवराज पाटील

भारतीय राजकारणी

शिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व १०वे लोकसभा सभापती आहेत. २०१० ते २०१५ दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते.

शिवराज पाटील

पंजाबचे राज्यपाल व चंदिगढचे प्रचालक
कार्यकाळ
२२ जानेवारी २०१० – २१ जानेवारी २०१५
मागीलएस.एफ. रॉड्रिगेज
पुढीलकप्तान सिंह सोळंकी

कार्यकाळ
२२ मे २००४ – ३० नोव्हेंबर २००८
पंतप्रधानमनमोहन सिंग
मागीललालकृष्ण अडवाणी
पुढीलपी. चिदंबरम

कार्यकाळ
१० जुलै १९९१ – २२ मे १९९६
मागीलरवी रे
पुढीलपी.ए. संगमा

लोकसभा सदस्य
लातूर साठी
कार्यकाळ
१९८० – २००४
मागीलउद्धवराव पाटील
पुढीलरुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील

जन्म१२ ऑक्टोबर, १९३५ (1935-10-12) (वय: ८८)
लातूर, हैदराबाद संस्थान
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१९७३ साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील ह्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. १९८० साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील ६ निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. २००४ साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील २००४ ते २००८ दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटीलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन