भागीरथी नदी

भागीरथी ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदीगंगेच्या दोन मूळ नद्यांपैकी एक नदी आहे (अलकनंदा नदी ही दुसरी). भागीरथी उत्तराखंडच्या उत्तर भागात तिबेटच्या सीमेजवळील गोमुख येथे उगम पावते. ती उत्तरकाशीतेहरी ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेला मिळते.

भागीरथी
भागीरथीचे गंगोत्री येथील पात्र
उगमगौमुख, हिमालय (गंगोत्रीच्या १८ किमी उत्तरेस)
मुखदेवप्रयाग, उत्तराखंड
पाणलोट क्षेत्रामधील देशउत्तराखंड
लांबी२०५ किमी (१२७ मैल)
उगम स्थान उंची३,८९२ मी (१२,७६९ फूट)
सरासरी प्रवाह२५७.८ घन मी/से (९,१०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ९,९२१
ह्या नदीस मिळतेगंगा नदी

हिंदू पुराणानुसार कोसलनरेश भगीरथ ह्याने आपल्या ६०,००० पूर्वजांची कपिल ऋषीच्या शापातून मुक्तता करण्यासाठी स्वर्गामधून गंगेला पृथ्वीवर आणले. त्याच्या प्रयत्नांसाठी गंगेच्या ह्या पात्राला भागीरथी असे नाव दिले गेले.

हिंदू धर्मामधील उत्तरकाशी हे पवित्र गाव भागीरथीच्या काठावर वसले आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजअहिल्याबाई होळकरमुखपृष्ठविशेष:शोधामनुस्मृतीनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक२०१९ लोकसभा निवडणुका२०२४ लोकसभा निवडणुकावर्ग:उझबेकिस्तानमधील शहरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानसंत तुकारामबापू वाटेगावकरज्ञानेश्वरलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविठ्ठल मंदिर (पंढरपूर)विनायक दामोदर सावरकरदिशाजून १महाराष्ट्रामधील जिल्हेमुक्ताबाईशिवाजी महाराजांची राजमुद्रागौतम बुद्धखासदारजागतिक दिवसआईमहाराष्ट्रसंभाजी भोसलेमटकामराठी भाषारायगड (किल्ला)नातीपसायदानसुषमा अंधारे