द साउंड ऑफ म्युझिक (चित्रपट)

ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.


द साउंड ऑफ म्युझिक हा १९६५ साली प्रदर्शित झालेला इंग्रजी भाषेतला अमेरिकन चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट वाईज ह्यांनी केले आहे. ते ह्या चित्रपटाचे निर्माते देखील आहेत. हा चित्रपट १९५९ सालच्या त्याच नावाच्या नाटकाचे रूपांतर आहे, ज्याचे संगीत रिचर्ड रॉजर्स ह्यांचे आहे आणि गीते ऑस्कार हॅमरस्टीन ह्यांची आहेत. अर्नस्ट लेमॅन ह्यांनी लिंडसे अँड क्रुझ ह्यांच्या पुस्तकाचे रूपांतर करून ह्या  चित्रपटाची पटकथा लिहिली.[१][२]

द साउंड ऑफ म्युझिक
दिग्दर्शनरॉबर्ट वाइझ
निर्मितीरॉबर्ट वाइझ
पटकथाअर्न्स्ट लेमॅन
प्रमुख कलाकारजुली अँड्रुझ, क्रिस्टोफर प्लमर
गीतेऑस्कार हॅमरस्टीन द्वितीय
संगीतरिचर्ड रॉजर्स
देशअमेरिका
भाषाइंग्लिश
प्रदर्शित१९६५

मारिया व्हॉन ट्रॅप ह्यांच्या आत्मकथेवर आधारीत, द स्टोरी ऑफ द फॅमिली सिंगर्स (व्हॉन ट्रॅप कुटुंबातील गायकांची कथा) हा चित्रपट आहे. ह्यामध्ये १९३८ साली एका तरुण मुलीला साल्झबर्ग, ऑस्ट्रिया येथील एका विधुर निवृत्त नौसेनेतील सैनिकाच्या घरी, त्यांच्या मुलांची काळजी घ्यायला पाठवलेले असते.[३]

द साउंड ऑफ म्युझिक ह्या चित्रपटाला पाच अकादमी पुरस्कार मिळाले, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ह्यासाठी  रॉबर्ट वाईज ह्यांना पुरस्कार मिळाले. ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील मिळाले.[४]

भूमिका संपादन

  • मारिया व्होन ट्रॅप ह्यांच्या भूमिकेत जुली अँड्रुझ[१]
  • कॅप्टन व्होन ट्रॅप ह्यांच्या भूमिकेत क्रिस्टोफर प्लमर (बिल ली यांनी प्लमर यांच्यासाठी पार्श्वगायन केले आहे.)[२]
  • बॅरनेस एल्सा व्होन श्रीडर ह्यांच्या भूमिकेत एलेनॉर पार्कर
  • मॅक्स डेटविलर ह्यांच्या भूमिकेत रिचर्ड हेडन
  • मदर अॅबेस ह्यांच्या भूमिकेत पेगी वूड
  • लीसल व्हॉन ट्रॅप ह्यांच्या भूमिकेत चारमियन कार
  • फ्रेडरिक व्हॉन ट्रॅप ह्यांच्या भूमिकेत निकोलास हॅमॉन्ड
  • लुईसा व्हॉन ट्रॅप ह्यांच्या भूमिकेत हिथर मेंझेस
  • कर्ट व्हॉन ट्रॅप ह्यांच्या भूमिकेत डूआन चेझ
  • ब्रीजीटा व्हॉन ट्रॅप ह्यांच्या भूमिकेत अँजेला कार्टराईट
  • मारता व्हॉन ट्रॅप  ह्यांच्या भूमिकेत डेबी टर्नर
  • किम कॅरॅथ ह्यांच्या भूमिकेत ग्रेटल व्हॉन ट्रॅप
  • सिस्टर मार्गारेटा ह्यांच्या भूमिकेत अॅना ली
  • सिस्टर बर्थी ह्यांच्या भूमिकेत पोर्शिया नेल्सन
  • हेर झेलर ह्यांच्या भूमिकेत बेन राईट
  • रॉल्फ ह्यांच्या भूमिकेत डॅनियल तृहिट
  • फ्रो शमिट ह्यांच्या भूमिकेत नॉर्मा वार्डन  

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "cast of the sound of music".
  2. ^ "The Unsung Overdub Star In 'Sound Of Music'". NPR.org (इंग्रजी भाषेत). 2021-06-05 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या