जेम्स फिस्क

जेम्स फिस्क, जुनियर (१ एप्रिल, १८३५:पौनाल, व्हरमाँट, अमेरिका - ७ जानेवारी, १८७२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा एकोणिसाव्या शतकातील अमेरिकन रोखेव्यापारी आणि उद्योगपती होता. हा त्याच्या समकालीनांमधील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक होता. याने अनेक प्रश्नांकित आर्थिक व्यवहार आणि उलाढाली केल्या. चंदेरी युग (गिल्डेड एज) मधील ठग धनाढ्यांपैकी (रॉबर बॅरन) या अग्रगण्य होता.

याने रोखेबाजारात तसेच ईरी रेल्वेमार्ग बांधून संपत्ती कमावली. याने १८६९ मध्ये जे गूल्ड बरोबर संगनमत करून अमेरिकेतील सोनेबाजार काबीज करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्त्युत्तर म्हणून राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँटने अमेरिकेच्या तिजोरीतील सोने विकायला काढल्यावर सोन्याचे भाव कोसळले आणि सामान्य जनतेला याचा मोठा फटका बसला.

फिस्कच्या व्यावसायिक भागीदाराने त्यांच्या भांडणामध्ये फिस्कचा खून केला.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशामुंजा (भूत)नवग्रह स्तोत्रमुरलीकांत पेटकरगणपती स्तोत्रेवर्ग:पुणे जिल्ह्यातील नद्याफादर्स डेकावीळजिजाबाई शहाजी भोसलेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरमहाराष्ट्रामधील जिल्हेरायगड (किल्ला)संत तुकारामभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमहाराष्ट्रपवन कल्याणमाहिती तंत्रज्ञान कायदाअटलबिहारी वाजपेयीभारताचे संविधानभारत-श्रीलंका शांती करारमहाराष्ट्र शासनरत्‍नागिरी जिल्हासोलापूर भुईकोट किल्लाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषावडीलगोवा क्रांती दिनभारताच्या पंतप्रधानांची यादीजिल्हा परिषदरक्षा खडसेज्योतिर्लिंगशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीविश्वजीत कदम