गुयुक खान ( इ.स. १२०६ - मृत्यू: इ.स. १२४८)हा मोंगोल सरदार ओगदेई खानचा मुलगा होता. हा अत्यंत बेजबाबदार व उर्मट होता. ओगदेईला आपल्या पश्चात तो गादीवर बसावा असे वाटत नव्हते. ओगदेईच्या मृत्यूनंतर त्याची बायको व गुयुकची आई तोरेगीन खातूनने सुमारे ४-५ वर्षे राज्यकाळ सांभाळला व नंतर गुयुकला बसवले.

गुयुक खान
खान (मंगोल शासक)
अधिकारकाळ१२४६ - १२४८
जन्मइ.स. १२०६
मृत्यूइ.स. १२४८
पूर्वाधिकारीओगदेई खान
वडीलओगदेई खान
आईतोरेगीन खातून
राजघराणेबोर्जिगीन

बेजबाबदार व जुलमी गुयुक खानाने गादीवर बसल्यावर सर्व जुन्या सल्लागारांना देहांताची शिक्षा दिली. जोचीचा मुलगा बाटु खान याला गुयुक खानाची नियुक्ती मान्य नव्हती. या दोघांतील बेबनाव वाढत होता व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रशियाच्या दिशेने निघालेल्या गुयुकचा अकस्मात मृत्यू झाला.

गुयुक खानानंतर सत्ता तोलुई खानच्या घराण्याकडे गेली.

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण