सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

राशी संपादन

दर १४ जानेवारी रोजी भारतात 'मकर संक्रांत' साजरी होते कारण त्यावेळी सूर्य (ज्योतिष) मकर राशीमध्ये प्रवेश करीत असतो. या राशींची नावे, राशी स्वामी आणि क्रांतिवृत्तातील अंश खालीलप्रमाणे आहेत.

क्रमांकराशीचे नावराशी स्वामीक्रांतिवृत्ताचे अंश
मेषमंगळ (ज्योतिष)००१ ते ०३०
वृषभशुक्र (ज्योतिष)०३१ ते ०६०
मिथुनबुध (ज्योतिष)०६१ ते ०९०
कर्कचंद्र (ज्योतिष)०९१ ते १२०
सिंहसूर्य (ज्योतिष)१२१ ते १५०
कन्याबुध (ज्योतिष)१५१ ते १८०
तूळशुक्र (ज्योतिष)१८१ ते २१०
वृश्चिकमंगळ (ज्योतिष)२११ ते २४०
धनुगुरू (ज्योतिष)२४१ ते २७०
१०मकरशनी (ज्योतिष)२७१ ते ३००
११कुंभशनी (ज्योतिष)३०१ ते ३३०
१२मीनगुरू (ज्योतिष)३३१ ते ३६०

नक्षत्रे संपादन

क्रांतिवृत्ताचा १/२७ भाग म्हणजे एक नक्षत्र. एकूण नक्षत्रे २७ आहेत. एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे असतात, प्रत्येक नक्षत्र १३ अंश २० कलांचे असते. (त्यात ४ चरण असतात). एक नक्षत्र अनेक तारकांनी बनलेले असते. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची चंद्ररास आणि जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी जी रास असेल ती त्या व्यक्तीची लग्नरास.

प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्त्व, इ. असते. राशींची तत्त्वे चार आहेत अशी कल्पना आहे. अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायू (स्वभावाने चंचल, गतिशील) आणि जल (स्वभावाने हळवा). मेष रास, सिंह रास आणि धनु रास या अग्नि तत्त्वाच्या, वृषभ रास, कन्या रास आणि मकर रास या पृथ्वी तत्त्वाच्या, मिथुन रास, तूळ रास आणि कुंभ रास या वायू तत्त्वाच्या तर कर्क, वृश्चिक आणि मीन या जल तत्त्वाच्या राशी आहेत.

संदर्भ संपादन

  • अश्वलायन - जुना संदर्भ ग्रंथ
  • होरासिद्धि - जुना संदर्भ ग्रंथ
  • राशी चक्र, लेखक : शरद उपाध्ये

हे सुद्धा पहा संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने