न्यू मेक्सिको

न्यू मेक्सिको (इंग्लिश: New Mexico; En-us-New Mexico.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले न्यू मेक्सिको क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील पाचवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३६व्या क्रमांकाचे राज्य आहे. हे राज्य देशात सहाव्या क्रमांकाचे तुरळक लोकवस्तीचे आहे. अमेरिकन संघात सामील होणारे न्यू मेक्सिको हे ४७वे राज्य होते.

न्यू मेक्सिको
New Mexico
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वजचिन्ह
टोपणनाव: लॅंड ऑफ एंचांटमेंट(Land of Enchantment)
ब्रीदवाक्य: Crescit eundo (लॅटिन)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा-
इतर भाषाइंग्लिश, स्पॅनिश
राजधानीसांता फे
मोठे शहरआल्बुकर्की
क्षेत्रफळ अमेरिकेत ५वा क्रमांक
 - एकूण३,१५,१९४ किमी² 
  - रुंदी५५० किमी 
  - लांबी५९५ किमी 
 - % पाणी०.२
लोकसंख्या अमेरिकेत ३६वा क्रमांक
 - एकूण२०,५९,१७९ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता६.२७/किमी² (अमेरिकेत ४५वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश६ जानेवारी १९१२ (४७वा क्रमांक)
संक्षेप  US-NM
संकेतस्थळwww.newmexico.gov

न्यू मेक्सिकोच्या दक्षिणेला मेक्सिकोचे शिवावा राज्य, नैऋत्येला सोनोरा राज्य, पश्चिमेला अ‍ॅरिझोना, वायव्येला युटा, उत्तरेला कॉलोराडो, ईशन्येला ओक्लाहोमा तर पूर्वेला व आग्नेयेला टेक्सास ही राज्ये आहेत. सांता फे ही न्यू मेक्सिकोची राजधानी तर आल्बुकर्की हे सर्वात मोठे शहर आहे. रियो ग्रांदे ही उत्तर अमेरिकेमधील एक नदी येथील सर्वात मोठी नदी आहे.

लॅटिन अमेरिकन वंशाच्या रहिवाशांच्या टक्केवारीमध्ये न्यू मेक्सिकोचा अमेरिकेत प्रथम क्रमांक आहे (४४.५ टक्के). येथील २९ टक्के रहिवाशांची मातृभषा स्पॅनिश आहे. तसेच येथे नावाहोपेब्लो ह्या स्थानिक आदिवासी वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत. ह्यामुळे न्यू मेक्सिकोच्या समाजावर स्थानिक अमेरिकन व मेक्सिकन संस्कृतीचा मोठा पगडा आहे.

खनिज तेल व वायु, संरक्षण व पर्यटन हे न्यू मेक्सिकोमधील सर्वात मोठे उद्योग आहेत. येथील अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत कमकुवत आहे.

मोठी शहरे संपादन

गॅलरी संपादन

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने