चे गेव्हारा

डॉक्टर अर्नेस्टो "चे" गेव्हारा (स्पॅनिश: Ernesto Che Guevara), ऊर्फ चे गेव्हारा किंवा एल चे किंवा चे, (जून १४, इ.स. १९२८ - ऑक्टोबर ९, इ.स. १९६७) हा आर्जेंटिनाचा मार्क्सवादी क्रांतिकारक, लेखक, गनिमी लढवय्यांचा म्होरक्या, राजकीय नेता आणि लष्करतज्ज्ञ होता. तो क्यूबाच्या क्रांतिकाळातला एक प्रमुख नेता होता.

चे गेव्हारा
जन्मअर्नेस्टो गेव्हारा
१४ जून, इ.स. १९२८
रोझारियो, सांता फे, आर्जेन्टिना
मृत्यू९ ऑक्टॉबर, इ.स. १९६७ (वय ३९)
ला हिगुएरा, वायेग्रांदे, बोलिव्हिया
मृत्यूचे कारणमृत्युदंड
चिरविश्रांतिस्थानचे गेव्हारा माउसोलियम, सांता क्लारा, क्यूबा
प्रशिक्षणसंस्थाबुएनोस आइरेस विद्यापीठ
पेशाडॉक्टर, लेखक
ख्यातीक्रांतिकारक
वडीलअर्नेस्टो गेव्हारा लिंच

वैद्यकीय शिक्षण घेत असताना चेने लॅटिन अमेरिकेचे भ्रमण केले. त्यादरम्यान त्याला गरिबी व एलियनेशनचे विदारक दृश्य आढळले. त्यामुळे त्याचे मतपरिवर्तन झाले. त्याचे अनुभव व त्याच्या निरीक्षणांद्वारे तो ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचला की "लॅटिन अमेरिकन प्रदेशात रुजलेली आर्थिक विषमता ही भांडवलशाही, एकाधिकारशाही, नव-वसाहतवादसाम्राज्यवाद ह्या आंतरिक घटकांचा परिणाम आहे. ह्यावर एकमात्र उपाय म्हणजे जागतिक क्रांती आहे." ह्या विचारांनी त्याला ग्वाटेमालाच्या सामाजिक पुनर्रचनेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हे पुनर्रचनेचे कार्य ग्वाटेमालाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॅकोबो आर्बेंझ ह्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते.

सुरुवातीचे जीवन संपादन

चे गेव्हारा याचा जन्म १४ जून १९२८ रोजी दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टिनामध्ये देशात झाला.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ ग्रेट मराठी. "क्रांतिकारक अर्नेस्टो चे गव्हेराच्या काही आठवणी". greatmarathi.com. Archived from the original on 2020-01-26. 26 जानेवारी 2020 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने