क्रियाविशेषण

क्रियाविशेषण क्रिये विषयी विशेष माहिती देणाय्रा शब्दांस क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदा बद्दल विशेष माहिती देणारे शब्द असतात, उदा.१) राम अधाशासारखा खातो. २) ती लगबगीने घरी पोहोचली.३) बाहेर जोरदार पाऊस पडतो.४) वैशाली चांगली मुलगी आहे.वरील वाक्यात - अधाशासारखा, लगबगीने, जोरदार, चांगली ही क्रियाविशेषण आहेत.

' क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात,त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात 'क्रियाविशेषणाचे प्रकार :

१. कालवाचक : क्रिया घडण्याची वेळ,काल दर्शवितात.उदा.:आज,उद्या,नेहमी,आता,पूर्वी अचानक इ.२.स्थलवाचक :

वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवितात त्या अव्ययाना स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात. उदा.: इथे,तिथे,चोहीकडे,जवळ,दूर,वर इ.

३.रीतीवाचक :

वाक्यातील क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दर्शवितात. उदा.: तो उभ्याने गटागटा पाणी पितो.

४.संख्यावाचक वा परिणामवाचक :

ही अव्यय क्रिया किती वेळ घडली किंवा क्रियेचे परिणाम दर्शवतात. उदा.:किंचित खरचटले,जरा लागले,अगदी इ.

५.प्रश्नार्थक :

वाक्याला प्रश्नचे स्वरूप देणा-या अव्ययांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदा.: मला तुमच्या घरी न्यालना ?

६.निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय :

ही अव्यय क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवितात. उदा.: तो न चुकता येतो.

७.स्वरूप मुलक :

काही क्रियाविशेषण अव्यय दुस-या शब्दापासून साधलेली असतात त्यांना स्वरूप मूलक अव्यय असे म्हणतात. उदा.: तो हसत बोलतो.

काही मूळचीच क्रियाविशेषण अव्यय असतात.उदा.: पुन्हा,हळू,खरोखर,लवकर इ.

हे सुद्धा पहा संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने