एफ-१६ फायटिंग फॉल्कन

एफ-१६ फायटिंग फॉल्कन हे अमेरिकन बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या जनरल डायनामिक्स या कंपनीने अमेरिकेच्या वायुसेनेसाठी बनवले होते. सुरुवातीला दिवसा लढण्यासाठी प्रमुख लढाऊ विमान म्हणून याला बनवले गेले होते. पण सततच्या सुधारणा आणि तांत्रिक विकासामुळे हे विमान सर्व प्रकारच्या वातावरणात लढण्यासाठी सक्षम आणि यशस्वी बहूद्देशीय लढाऊ विमान बनले. १९७६ पासून आजपर्यंत ४,५०० पेक्षा जास्त एफ-१६ विमाने वेगवेगळ्या देशांसाठी बनवण्यात आली आणि त्यातली बरीचशी अजुनही सेवेत कार्यरत आहेत. अमेरिकन वायुसेना आता ही विमाने खरेदी करत नाही आणि त्यांच्या ताफ्यातील जुन्या एफ-१६ विमानांना इतर विमानांनी बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण विदेशी वायुसेनांना या विमानाच्या सुधारीत आवृत्त्या अजूनही विकल्या जातात.

एफ-१६ फायटिंग फॉल्कन

अमेरिकन वायुसेनेचे एक एफ-१६ सी विमान २००८ साली इराकवरून उडताना

प्रकारबहुउद्देशीय विमान
उत्पादक देशयुनायटेड स्टेट्स
उत्पादकजनरल डायनामिक्स
लॉकहीड मार्टिन एरोनॉटिक्स
पहिले उड्डाण२० जानेवारी १९७४
समावेश१७ ऑगस्ट १९७८
सद्यस्थितीसेवेत आहे
मुख्य उपभोक्तायुनायटेड स्टेट्स वायुदल
२६ इतर वापरकर्ते
उत्पादन काळ१९७३ - आता
उत्पादित संख्या४,५७३ (जुलै २०१६ पर्यंत)[१]
प्रति एककी किंमतएफ-१६ए/बी: $१.४६ कोटी (१९९८)[२]

एफ-१६सी/डी: $१.८८ कोटी (१९९८)[२]

भारतीय वायुसेनेसाठीच्या मध्यम बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या स्पर्धेमध्ये (एम.एम.आर.सी.ए.) लॉकहीड मार्टिनने एफ-१६आयएन सुपर व्हायपर देऊ केले होते.[३] ती स्पर्धा फ्रान्सच्या रफल विमानाने जिंकली.

एफ-१६सीची वैशिष्ट्ये संपादन

  • चालक दल : १
  • लांबी : १५.०६ मी (४९ फुट ५ इंच)
  • पंखांची लांबी : ९.९६ मीटर (३२ फुट ८ इंच)
  • उंची : ४.८८ मी (१६ फुट)
  • पंखांचे क्षेत्रफ़ळ : २७.८७ चौरस मी (३०० चौरस फुट)
  • निव्वळ वजन : ८,५७० कि.ग्रॅ.
  • सर्व भारासहित वजन : १२,००० कि.ग्रॅ.
  • कमाल वजन क्षमता : १९,२०० किलो
  • इंधन क्षमता : ३,२०० किलो
  • कमाल वेगः
    • समुद्रसपाटीला : माख १.२ (१,४७० किमी/तास)
    • उंचावर : माख २[२] (२,१२० किमी/तास)
  • पल्ला : ४,२२० किमी
  • प्रभाव क्षेत्र : ५५० किमी
  • बंदुक : २० मिमी, ५११ गोळ्या
  • उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १५,२४०+ मी

संदर्भ संपादन

  1. ^ "लॉकहीड मार्टिन लुक्स टु अपग्रेड ५०० इन-सर्व्हिस एफ-१६" (इंग्रजी भाषेत). 23 August 2016 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "एफ-१६ फॅक्ट शीट" (इंग्रजी भाषेत). 2016-10-16 रोजी पाहिले.
  3. ^ पांडे, विनय. "एफ-१६ मेकर लॉकहीड माऊंट्स ॲन इंडिया कॅंपेन" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-11-05. 23 August 2016 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने